माझी वसुंधरा , माझे कर्तव्य ” या अभियानास प्रारंभ
नेहरु युवा मंडळ , मुर्तिजापूर चा स्तुत्य उपक्रम
मुर्तिजापूर : वृक्षारोपणात गेल्या दिड दशका पासुन अरविरत कार्य करणाऱ्या नेहरु युवा मंडळ , मुर्तिजापूर च्या वतीने वन दिन , वन सप्ताह अंतर्गत ” माझी वसुंधरा , माझे कर्तव्य ” या अभियानास प्रारंभ करण्यात आला .
मागिल वर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या पर्वावर उदघाटीत ” माझी वसुंधरा , माझे कर्तव्य ” हे अभियान राज्यस्तरावर राबविण्यात आले होते , ते संत गाडगेबाबा यांच्या संदेश यात्रेच्या पालखी सोहळ्या सबोत … जिथे ही पालखी थांबायची त्या ठिकाणी… सिड बॉल (बीजा़ंवर शेणाचे आवरण केलेले लाडु) टाकुन चालता फिरता सहज वृक्षारोपण ही अनोखी संकल्प प्रथम राबविण्यात आली होती.
1 जुलै ते 7 जुलै हा सप्ताह संपुर्ण भारत भर वन महोत्सव म्हणून उत्स्फूर्त पणे उत्साहात साजरा केला जातो . या वन सप्ताह वन महोत्सवाच्या निमित्ताने तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेयर सोसायटी मुर्तिजापूर कार्यालयात गोवर्धन इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रा.विनायक वानखडे , उमेश शिरसाट ,पंकज चतुर यांच्या प्रमुख उपस्थितीत या वर्षी राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण अभियानास दि. 4 जुलै रोजी सकाळी 11वा. प्रारंभ करण्यात आला .
तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेयर सोसायटी आणि नेहरु युवा मंडळ मुर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमास अकोला येथुन स्वेता शिरसाट , यश साळवे , नेहरु युवा मंडळ अध्यक्ष अनिल डाहेलकर , मनिषा तायडे , गजानन खंडारे यांची उपस्थिती होती.