माउली अन् तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ
साभार : – नेट सौजन्य
( नव प्रहार : अनिल डाहेलकर )
पादुका दर्शनासाठी लोटला वैष्णवांचा जनसागर..
श्रीमंत सरदार महादजी शिंदेचा वारसा लाभलेल्या
व वारी सोहळ्यात शिंदे सरकारला मान असणाऱ्या वैष्णवांच्या सोहळ्यातील
वानवडीत मानाच्या आरतींसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज
व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखींचे श्रीमंत सरदार महादजी शिंदे
यांच्या पावनभुमीतून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.
वानवडीत भैरोबानाला चौक या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचे
सकाळी ७.३० वा आगमन झाले.
माऊलींच्या पालखी मध्ये श्रीमंत सरदार महादजी शिंदेच्या पादुका ठेवून
परंपरेने चालत आलेली मानाची आरती घेण्यात आली.
आरती सुरु होण्याअगोदर चौपदारांकडून स्तंभ फिरवण्यात येतो
आणि एका क्षणात सर्व वैष्णवांचा जनसमुदाय आरतीसाठी सज्ज झाला.
आरतीसाठी वानवडी भजनी मंडळ, ह.भ.प.श्री. बाळासाहेब गव्हाणे
व श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांची समाधी असलेल्या
सिंधिया देवस्थान ट्रस्टचे शिंदे छत्री येथील व्यवस्थापक यशवंतराव भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते.
आरती होऊन माऊलींची पालखी हडपसरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वानवडी,
भैरोबानाला येथे सकाळी ९.१५ वा. आगमन झाले.
वानवडी गाव भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे तुकाराम महाराजांच्या पालखी पुढे
आरती घेण्यात आली व वारी सेवा म्हणून वानवडीकरांची दिंडी, भजन व ग्यानवा तुकाराम मुखी ठेवून
हडपसरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
या पालीखीसोहळ्यात वानवडी पोलीस तसेच पोलीस मित्रांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आळंदी ते पंढरपूर पर्यंत असणाऱ्या वारी सोहळ्यात श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे.