शैक्षणिक

सेंट पॉल अकॅडमी हिवरखेडची स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी

Spread the love

 

बाळासाहेब नेरकर कडून

हिवरखेड येथील स्थानिक सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड या शाळेची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येत असणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरावर सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. इयत्ता पाचवी मधून यश संतोष दाभाडे या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ग्रामीण यामध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर इयत्ता आठवीची विद्यार्थिनी भक्ती जितेंद्र लखोटिया राष्ट्रीय ग्रामीण यामध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. तसेच कृतिका खारोडे, विधि आंबुसकर, इशिता हिवराळे, अंशुल निंबोकार, सर्वज्ञ येऊन, स्वानंदी वानखडे, वंश जाधव, वृषाली गावंडे, प्रांजली खारोडे, आराध्या राजनकर, सोहम गावंडे, आराध्य कवळकार, स्वराली उंबरकर, आरुषी देशमुख, पूर्वा राऊत, हुमायु खान, समर्थ गोरे, साहिल तायडे, आरुष सोळंके, अर्णव बनकर, सिद्धी टावरीझ ओजस मालपाणी हे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण झालेले असून महाराष्ट्र शासनातर्फे मिळणाऱ्या स्कॉलरशिपसाठी पात्र ठरलेले आहेत तसेच इयत्ता आठवी मधून कार्तिक हागे, तुषार सोनवणे, भाग्यश्री सोळंके, आदित्य भराटे, गौरी काकड, अनुष्का माळी, मुली बजाज, गौरी आस्वार, सूष्टी नाठे, हरिश वाघ सुमित हागे, जानवी कोरडे, रमणी हागे, फैजल मोहम्मद,आयुशी गावंडे, तुषार गावंडे, रुद्राक्ष विलास घुगळ इत्यादी विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षा पात्र झालेले असून महाराष्ट्र शासनातर्फे मिळणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी सर उप मुख्याध्यापिका निमिता गांधी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री नवनीत लखोटिया, उपाध्यक्ष श्री लूणकरण डागा तसेच सचिव श्री प्रमोद चांडक यांनी शुभेच्छा दिल्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close