निघोज मधील हॉटेल व्यावसायिकावर तलवारीचे वार , एक गंभीर , तर इतर किरकोळ जखमी .
पारनेर [ सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – पारनेर तालुक्यातील निघोज येथील प्रसिध्द हॉटेल जत्रा मध्ये तलवार , कोयत्याचा वापर करून मालक प्रविण भाऊ भुकन , गणेश भाऊ भुकन व इतरांवर ५ जणांनी वार करून जखमी केले , त्यांना नगर मधील साई एशियन या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . या प्रकाराने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे .
प्रविण भुकन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे . ही घटना मंगळवारी रात्री ११ . ४० वाजता निघोज येथील वडगाव गुंड जवळील हॉटेल जत्रा मध्ये घडली . हॉटेल ची तोडफोड करण्यात आली असून निघोज मध्ये या घटनेने खळबळ उडाली आहे . मंगळवारी रात्री ११ वाजता हॉटेल जत्रा बंद करण्याच्या वेळेस जेवण मागितले असता , हॉटेल मालक प्रविण भुकन व गणेश भुकन यांचा भाचा याने हॉटेल बंद झाले आहे , असे सांगितले असता , तुला जेवण द्यावेच लागेल , अन्यथा राडा करू , असे धमकावले . त्यावेळी वाद नको , म्हणून जेवण दिले , पण जेवण करताना , जेवण चांगले नाही , म्हणून मोठ मोठ्याने शिवीगाळ करू लागले , ते ऐकून बाहेर उभे असलेले प्रविण भुकन आत येवून त्यांना म्हणाले की , पैसे देऊ नका , पण शिव्या बंद करा . असे म्हणाले असता , तिघांनी प्रविण ला शिवीगाळ व धक्का बुक्की केली . त्यावेळी आदिनाथ पठारे याने थांबा आता तुम्हांला सोडत नाही , आमच्या भाईला बोलविता , अशी धमकी दिली . त्यावेळी प्रविण व गणेश भुकन यांनी त्यांची समजूत काढली व हॉटेल रात्री ११ . ४० वाजता बंद करण्याच्या तयारीला लागलो व सदर घटना रात्री निघोज बिटच्या पोलीसांना ही घटना दुरध्वनी द्वारे सांगितली . तदनंतर थोड्याच वेळात रात्री ११ . ५५ वाजता हॉटेल मध्ये पुन्हा आदिनाथ पठारे याच्या हातात कोयता , धोंड्या जाधव याच्या हातात तलवार , प्रथमेश सोनवणे , विशाल पठारे याच्या हातात पाईप , शंकर पठारे याच्या हातात दांडा घेवून त्यांनी भाचा ओंकार रसाळ , वेटर अजय व सुजान यांच्या हात, मान , पाय , मांडी वर कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण करून दुखापती केली . हे पाहून प्रविण भुकन मध्ये पडला असता , त्याच्या डोक्यावर तलवार केले , पण ते त्यांनी हातावर झेलल्या ने दोन्ही हातावर गंभीर घाव झाले . तदनंतर तरी ही मारहाण सुरू राहिल्याने व रात्रीची वेळ असल्याने कोणी मदतीला येणे शक्य नसल्याने आम्ही सर्व जण हॉटेलच्या बाहेर जीव वाचविण्यासाठी पळाले असता , निघोज बिटचे तोरडमल हे आले असता, हे ५ ही आरोपी त्यांनी आणलेल्या एक कार व दोन मोटर सायकल वर निघून गेले .
यावेळी हॉटेलची तोडफोड करून एल ए टि व्ही , लॅपटॉप , काऊंटर , लॅपटॉप व इतर असे सुमारे १ लाख रुपयांच्या वस्तूंचे नुकसान झाले .
या प्रकाराने निघोज परिसरा तील व्यावसायीकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे . पोलीस कारवाई ची प्रक्रिया सुरू आहे . या घटने मागे नक्की काय कारण आहे , ते पोलीस तपासात स्पष्ट होईल . या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक खंडागळे , निघोज बिटचे ठाणे अंमलदार गणेश डहाळे व पोलीस पथक करत असून पोलीसांचे विविध पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत .