शैक्षणिक

निघोज येथील सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील फार्मसी कॉलेजची शेकडा १०० टक्के निकालाची परंपरा कायम

Spread the love

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – निघोज येथील सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील फार्मसी कॉलेज चा निकाल शेकडा १०० टक्के लागला असून यामध्ये गतवर्षी प्रमाणे याही वर्षी पण कॉलेज चा निकाल शेकडा १०० टक्के लागला आहे, अशी माहिती फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष रंगनाथ वराळ पाटील यांनी दिली.
या मध्ये प्रथम वर्षाच्या आकांशा जयवंत बोचरे या विद्यार्थिनी चा प्रथम क्रमांक आला असून शेकडा ८४ . ८o टक्के गुण , द्वितीय क्रमांक निकिता रमेश भाकरे ८१ . ३० टक्के गुण , तृतीय क्रमांक सारथी बाळू ढवळे शेकडा ८० . ८o टक्के गुण , काजल संतोष मोरे शेकडा ८० ८० टक्के गुण मिळाले . तसेच द्वितीय वर्ष डी. फार्मसी मध्ये प्रथम क्रमांक प्रीती अरुण मावळे शेकडा ८३ . ३६ टक्के गुण , द्वितीय क्रमांक प्रतीक्षा प्रदीप हारे शेकडा ८२ टक्के गुण , तसेच तृतीय क्रमांक ऋतुजा बारकू कोळपे शेकडा ८२ टक्के गुण , ऋतुजा प्रकाश अहिरे ८१ . ८२ टक्के गुण , विशाखा विकास जाधव शेकडा ८१ . ८२ टक्के गुण मिळाले आहे. ह्या विदयार्थ्यांनी असे उल्लेखनीय गुण मिळून कॉलेज व आई वडिलांनाच नाव उंच केले आहे. सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कॉलेजचे अध्यक्ष रंगनाथ वराळ पाटील व सचिव विराज वराळ पाटील यांनी अभिनंदन केले. डी.फार्मसी कॉलेज चे उप प्राचार्या शिफा शिकलगार व बी. फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ. कुलदीप वैद्य सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी
अभिनंदन करून कौतूक केले आहे .. वराळ पाटील कॉलेज हे महाराष्ट्रात नामांकित कॉलेज असून अनेक गोरगरीब विदयार्थी प्रवेश घेऊन उत्तीर्ण गुण मिळवून यशस्वी झाले आहेत .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close