मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजणेच्या लाभासाठी महीला सह पुरुष ही लागले कागद जुळवण्याच्या कामाला
तलाठी कार्यालय समोर गर्दी,
घाटंजी ता. प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
आज दी. १/७/२४ रोजी घाटंजी तलाठी कार्यालय येथे मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजना लाभ मिळावा या साठी लागणारा उत्पन्न साठीचा तलाठी अहवाल मिळावा या करिता महीला सह पुरुषवर्गाने ही हातात कागद घेऊन तलाठी कार्यालय समोर गर्दी केली. महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाणे ५० पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ५९.१० टक्के व स्त्रीयांची टक्केवारी २८.७० टक्के इतकी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत ही संकल्पणा घेऊन तसेच महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे हे कळताच त्यासाठी लागणारी कागदपत्र जमवाजम करण्याची धावपळ जनतेत सूरु झाली. त्यामूळे तलाठी कार्यालय समोर गर्दीच गर्दी झाली.
००००००००००००००००