जि. प. वर्धा चे तत्कालीन मु. का. अ. मा. रोहनजी घुगे यांचा निरोप समारंभ
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा शाखा – वर्धा कडून सत्कार
वर्धा / प्रतिनिधी
मा. *श्री .रोहनजी घुगे* (भा. प्र . से.) यांचे वर्धा जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून *ठाणे* जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्थानांतरण झाले.
त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम शुक्रवार दि. 28 -6 -2024 ला सिंधुताई सपकाळ सभागृह जि. प. वर्धा येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी *मा. जितिन रहमान* साहेब उपस्थित होते. जिल्हा परिषदेमध्ये सर्व खाते प्रमुख , कर्मचारी व शिक्षक यांचे उपस्थितीत सदर निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.
*यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा वर्धा चे पदाधिकारी व राज्य संघाचे कार्याध्यक्ष यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या वतीने *मा.रोहन घुगे* साहेबांचा यथोचित सत्कार करून त्यांना त्यांच्या पुढील कार्यास व वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी शुभेच्छा देताना आपले मनोगतात शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष *मा. लोमेश वऱ्हाडे* यांनी वर्धा जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना मा. घुगे साहेब यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला व जि. प. प्राथमीक शाळांच्या संबंधित विद्यार्थी, शाळा व शिक्षक यांच्या संबंधीत समस्या , प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी साहेबांनी केलेल्या भरीव सहकार्याचा उल्लेख करीत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी सभागृहामध्ये *मा.रोहन घुगे* साहेबांची बदली तडका फडकी झाली व ती कोण्या एका शिक्षक नेत्याने दोन दिवसात करून घेतली. आणि वेळ पडल्यास दुसऱ्या नवीन सीईओ ची सुद्धा बदली करू अशा प्रकारच्या फुगलेल्या बेडका समान जिल्ह्यात पसरविलेल्या अपप्रचाराची खमंग चर्चा सुद्धा सभागृहात झाली. व त्यावर *मा.रोहन घुगे* साहेबांनी माझी बदली विनंतीने व माझ्या सोयीच्या ठिकाणी मी करून घेतली व यासाठी माझे गेल्या चार महिन्यापासून प्रयत्न होते. असे प्रतिपादन करून *त्यांचे बदलीबाबतच्या एका शिक्षक संघटनेच्या वैफल्यग्रस्त नेत्याने व त्याचे अंधभक्त कार्यकर्त्यांनी उठवलेल्या वावड्यांवर व अपप्रचारावर पडदा पाडला.*