इंडो एशिया मेत्ता फाउंडेशन इंडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेचे माननीय नितीनजी गजभिये व स्मिता वाकडे यांचा आर्वी येथे करण्यात आला सत्कार
येत्या सप्टेंबर 2024 ला श्रीलंकेतील पवित्र बुद्ध अस्थी धातूंचे भारतात होणार आगमन*
महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात* श्रीलंकेतील पवित्र बुद्ध धातूंचे व विविध*राष्ट्रातील पूजनिय संघाचे
होणार आगमन
तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थिधातू सहित निघणार भव्य धम्म यात्रा
माननीय नितीनजी गजभिये यांनी दिली माहिती
आर्वी :- प्रतिनिधी
इंडो एशिया मेत्ता फाउंडेशन इंडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माननीय* *नितीनजी गजभिये व स्मिता वाकडे* यांचे आर्वी येथे सदिच्छा भेट दिली. इंडो एशिया मेत्ता फाउंडेशन इंडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने भारतीय बौद्ध भिक्खूनंचे प्रशिक्षण थायलंड मध्ये पार पडले
याप्रसंगी माननीय नितीनजी गजभिये व स्मिता वाकडे यांचा आर्वी येथे सर्वांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समिती आर्वीचे अध्यक्ष सुजित दादा भिवगडे व महासचिव सुरेश भिवगडे व प्रा डॉ विजया मुळे आवर्जून उपस्थित होते.
स्मिता वाकडे यांनी बुद्धांच्या पवित्र अस्थी धातूवर उभारण्यात आलेल्या स्तूपाबद्दल तसेच विविध संग्रहालयात संग्रहित केलेल्या बुद्ध धातू बद्दल सविस्तर माहिती सांगितली.
माननीय नितीन गजभिये यांनी येत्या सप्टेंबर मध्ये श्रीलंका इथून तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थी धातूंचे भारतात आगमन होणार असून विविध राष्ट्रातील बौद्ध भिक्षू या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील अशी माहिती सांगितली.
आर्वी शहरातही या भव्य धम्म सोहळ्याचे आयोजन करावे अशी विनंती उपस्थितांनी यावेळी केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माननीय धम्म प्रचारक सुरेश भिवगडे यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले निशुल्क अभ्यासालय आर्वी या ठिकाणी करण्यात आले होते
या कार्यक्रमाला संचालिका
प्रा. डॉ. विजयाताई मुळे
प्रा. पंकज वाघमारे प्रा. डॉ. प्रवीण काळे प्रमोद चौरपगार,
प्रवीण अ काळे गौतम कुंभारे विलास बेंडे डॉ. राजपाल भगतई उपस्थित होते.