अखेर बारी समाजाच्या प्रलंबित मागण्या केल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केल्या पूर्ण
अखिल भारतीय बारी महासंघाच्या प्रयत्न्नांना आले यश
मनोहर मुरकुटे / प्रतिनिधी
गेली आठ महिन्यापूर्वी 1 ऑक्टोबर 2023 रोजी अखिल भारतीय बारी समाज महासंघा तर्फे संत नगरी शेगाव येथे अखिल भारतीय राष्ट्रीय बारी समाज महाअधिवेशन भरविण्यात आले होते या अधिवेशनास राज्यातील केंद्रीय मंत्री, माजी मंत्री, विरोधी पक्षनेते व सर्वच पक्षाचे नेते व मान्यवर उपस्थित होते व स्वतः उपमुख्यमंत्री दे्वेंद्रजी फडणवीस यांनी ऑडिओ क्लिप द्वारे समाजाला संबोधन केलें होतें ह्या कार्यक्रमाला 1 लाखाच्या घरात समाजबांधव एकत्र झाले होते यावेळी शासन दरबारी अधिवेशनामध्ये बारी समाजाच्या वतीने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासित केले होते ह्यामध्ये १)
ह भ प संत शिरोमणी श्री रूपलाल महाराज यांचे अंजनगाव येथे भव्य राष्ट्रीय स्मारक.
२) बारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ. ३) पान पिंपरी, पानमळे, मुसळी यांना औषधी पिकाचा दर्जा ई मागण्या नुकत्याच अर्थमंत्री अजितजी पवार ह्यांनी विधिमडळाचे अधिवेशनात मान्य केल्यात व जाहीर केले ह्याप्रसंगी अखिल भारतीय बारी महा संघाचे अध्यक्ष रमेशजी घोलप अनिलजी हिस्सल, रमेशजी डब्बे, देवीदास येऊल, रुपेश येऊल, दिनेश भोंडे, उमेश भोंडे,मनोहर मुरकुटे,वृषभ सातपुते, निलेश ढगे ई सर्व समाज बांधवानी मुख्यमंत्री, एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री दे्वेंद्रजी फडणवीस ह्यांचं आभार मानले केले सदरचे बाबींवर त्वरीत आदेश काढून समस्त बारी समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण केल्यात व संभंधित विभागाला पुढील कार्यवाहीसाठी आदेशीत केले, त्यामुळे सर्व बारी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गेली एक वर्षांपासूनचे अखिल भारतीय बारी समाज विकास महासंघचे प्रयत्न्नांना यश आले