खोदकामात एक दोन नव्हे सापडले तीन प्राणी पाहून धडकी भरेल
ते त्याठिकाणी आले कसे आणि काँक्रीट च्या रस्त्या खाली जिवंत राहिले कसे ही आश्चर्याची बाब
खोदकाम करतांना लहान मोठे प्राणी निघतात. काही वेळा लोकांना काही जुन्या वस्तू आणि ज्यांचे भाग्य जोरावर असेल त्यांना खजिना देखील सापडतो. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओत कजोडकणात जे प्राणी निघाले त्यांना पाहून लोकांना धडकी भरली. चला तर जाणून घेऊ काय आहे प्रकरण .
नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये खोदकाम करताना यातून एक भयानक प्राणी बाहेर निघाला आहे . नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडिओत जर तुम्ही पाहिले तर त्यात दिसते की, काही लोक जमिनीचे उत्खनन करत आहेत. मात्र याच वेळी जमिनीतून एक जीवघेणा जीव बाहेर येतो. हा जीव अथवा प्राणी दुसरा तिसरा कोण नसून मगरीचा चेहरा असतो. जमिनीतून मगरीच्या चेहरा पाहताच लोक थक्क होतात. यावेळी लोकांनी हातात हातोडे आणि काठ्या धरल्या, ज्याने त्यांनी जमीन खोदली. लोकांच्या हातात दोरीही दिसत आहे.
मुख्य म्हणजे ही मगर जमिनीच्या आत आली कुठून हे कोणालाही समजलेले नाही. ही मगर खाली गाडली गेली होती तरीही ती जिवंत होती. पुढे मगरीला पाहून एक व्यक्ती हातोड्याने मगरीचे तोंड दाबताना दिसत आहे. दुसरी व्यक्ती त्याच्या तोंडाभोवती दोरी बांधण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून त्याला बाहेर काढता येईल. हातोडा असलेली व्यक्तीही मागून जमीन फोडत आहे, जेणेकरून मगरीला सहज काढता येईल. नंतर मगरीला बाहेर काढताच ती रागाने गोल गोल फिरू लागते आणि स्वतःला दोरीपासून वेगळे करू लागते. पण धडकी भरवणारी गोष्ट म्हणजे पुढच्याच क्षणी आतून दुसरी मगर बाहेर येते आणि व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांकडे धावू लागते. नीट पाहिलं तर त्या दोघांच्या खाली तिसऱ्या मगरीचा मृतदेहही दिसतो. हे सर्व दृश्य फार भयाण अंजी भीतीदायक वाटू लागते. आता हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसता आहे.
दरम्यान हा व्हिडिओ @crazyclipsonly या X अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 3 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत तर अनेकांनी कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, मगरी दीर्घकाळ हायबरनेट करू शकतात, म्हणून ते कधीकधी जमिनीखाली गाडले जातात. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, हा व्हिडिओ 2 वर्षांपूर्वी इंडोनेशियाचा आहे. जमिनीखालून आवाज येत होता, तो तोडून पाहिलं तर आतून तीन मगरी बाहेर आल्या.