क्राइम

तिने मामेभावाच मदतीने आई आणि भावाचा घेतला जीव 

Spread the love

मावशी म्हणते ती समलैंगिक तर लग्नाच्या दबावामुळे तिने खून केल्याची ही चर्चा 

यमुनानगर: हरियाणातल्या यमुनानगरमध्ये येथे आई आणि लहान भावासोबत राहणाऱ्या एका 27 वर्षीय तरुणीने आपल्या मामेभावाच्या मदतीने आई आणि लहान भावाची हत्या केली आहे.  आई आणि लहान भाऊ तिच्या मागे लग्नाचा तगादा लावत होते असे म्हटले जात असे तरी आरोपी तरुणी ही समलैंगिक होती असा गौप्यस्फोट तिच्या मावशीने केला आहे. k

काजल असं आरोपी तरुणीचं नाव असून, तिला 13 मे रोजी 27 वर्षं पूर्ण झाली होती. तिची आई मीना आणि धाकटा भाऊ राहुल तिच्यावर लग्नासाठी दबाव आणायचे. तिला मात्र मुक्त जगायला आवडायचं. ती मुलांसारखी बेधडक जगायची. टी-शर्ट, जीन्स असेच कपडे घालायची. हेही आई आणि भावाला आवडायचं नाही. त्यामुळे विश्वकर्मा मोहल्ला इथे राहणाऱ्या कृश या 18 वर्षांच्या मामेभावाला हाताशी धरून तिने त्या दोघांना जीवनातूनच उठवलं. तिने कृशला लालूच दाखवली, की हत्या केल्यानंतर त्याला आजीचं घर मिळेलच. शिवाय ती त्याला 50 हजार रुपयेदेखील देईल. कृश तिच्या जाळ्यात अडकला आणि त्याने दोघांना ठार केलं.

यमुनानगर पोलिसांनी काजलला कोर्टात हजर केलं आणि दोन दिवसांचा रिमांड घेतला. पोलिसांनी सोमवारी कृशलाही अटक केली. काजलच्या आजीचं घर शांती कॉलनीत आहे. काजलचे एक मामा जयप्रकाश आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून, कृश त्यांचाच मुलगा आहे. दुसरा मामा शिवम वेगळा राहतो.

कृश बराच काळ आपले काका शिवम यांच्यासोबतच राहायचा. काजलच्या आजीला काजलच्या आईव्यतिरिक्त आणखी एक मुलगी आहे. काजलच्या आजीने आपल्या मृत्यूआधी आपल्या घराचा वारस काजलच्या आईला केलं होतं. कृशला भीती वाटत होती, की काजलची आई हे घर तिच्या नावावर करील. तसंच, काजलच्या आईचा भाऊ आणि बहीण हेदेखील यामुळे नाराज होते. त्यामुळे काजलच्या आईशी त्यांचं बोलणं-चालणं नव्हतं.

मध्यंतरीच्या काळात काजलही कुठे तरी गेली होती. काही काळानंतर ती आली. तेव्हा तिचं वाढतं वय पाहून आई आणि भावाने काजलवर लग्नासाठी दबाव आणायला सुरुवात केली. ती ते मान्य करत नव्हती. कपड्यांवरून तिला बोललेलंही तिला आवडायचं नाही. आपल्या भावाचं लग्न आपल्याच एका मैत्रिणीशी व्हावं, असंही तिला वाटत होतं, जेणेकरून अन्य कोणी तिच्या जीवनात ढवळाढवळ करणार नाही.

काजल घरात वरच्या मजल्यावरच्या खोलीत एकटीच राहायची. इन्स्टाग्रामवर तिने व्हीआयपी नवाब नावाने एक आयडी बनवलेला आहे. त्यावरच्या सगळ्या व्हिडिओत ती पुरुषी कपड्यांतच दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, कौटुंबिक परिस्थितीचा फायदा घेऊन काजलने हे हत्याकांड घडवून आणलं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close