सेलू येथे छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारण्याची मागणी
छत्रपतीचे मावळे संघटनेकडून करण्यात आली मागणी
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
आशिष इझनकर
वर्ध्याच्या सेलू शहर येथे यशवंत चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक निर्माण करण्याची मागणी छत्रपतीचे मावळे संघटनेने केली आहेय. सेलू शहरात असलेला उड्डाण पुल पाडण्यात आलाय. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे अशी मागणी होऊ लागली आहे. हा चौक मोठा होत आहे, रस्त्याचे देखील बांधकाम होत आहेय. छत्रपतीचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी छत्रपतींचे मावळे या संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहेय.निवेदन देते वेळी उपस्थीत पदाधिकारी अमोल अतकर,सचिन भोयर,मुकेश गावंडे,रितेश चौधरी,किरण अतकर,गणेश धुर्वे,गणेश पाटमासे,किशोर निकोडे,अक्षय काळुसे,नितीन साहू,पांडुरंग धोंगडे,आकाश कोसरे, पप्पू दांगट,हरिश सातपुते,धनश्याम सूर्यवंशी,नयन वैलकर,सुयोग कोल्हे,रितिक राऊत,हर्षद मसने आदि पदाधिकारी उपस्थित होते