अरे बाबो महिलेच्या पतीला तिचा नवरा तर आईला घेऊन सासरा पसार

महिलेची पोलिसात धाव आणि मदतीची याचना
पाटणा / नवप्रहार डेस्क
प्रेमात वय , जात- पात , गरीब- श्रीमंत असे काहीच पाहिले जात नाही. असे म्हणतात. पण प्रेमात नातं न पाहण्याची घटना फार क्वचित घडतात. अशीच एक घटना बिहार राज्याच्या मुजफ्फरनगर येथे घडली आहे. येथे ठाण्यात पोहचलेल्या महिलेने तिचा नवरा मेहुनीला तर सासरा तिच्या आईला घेऊन पळाल्याचे सांगितले. पोलिसांनी महिलेच्या पतीशी संपर्क साधला तेव्हा त्याने भलतेच संगीगले.
हे प्रकरण सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणाऱ्या सुधा कुमारी नावाच्या महिलेनं ९ जून रोजी पोलिसांना सांगितलं की, ‘मी फरीदपूर गावची रहिवासी आहे. 27 जून 2021 रोजी माझं लग्न छोटू नावाच्या तरुणाशी झालं होतं. तो भगवानपूरचा रहिवासी आहे. लग्नानंतर मी आणि छोटू सुखात राहत होतो. आम्हाला एक मुलगीही होती. जिचं आम्ही मिष्टी असं नाव ठेवलं. ती फक्त एक वर्षाची आहे. दरम्यान, माझ्या अल्पवयीन बहिणीशी छोटूचं फोनवर बोलणं सुरू झालं. या संवादाचं प्रेमात कधी रुपांतर झालं ते कळलंच नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या पतीचं माझ्याशी असलेलं वागणंही बदललं आहे. तो माझ्यावर सर्व प्रकारचे आरोप करू लागला आणि माझ्यापासून दूर राहण्याची कारणं शोधू लागला.’.
सुधाने सांगितलं की, 3 जून रोजी छोटू आणि माझी लहान बहीण घरातून पळून गेले. दोघेही मुझफ्फरपूर स्टेशनवर लग्न करून दिल्लीला गेले. सुधाच्या म्हणण्यानुसार, यानंतर ती तिच्या माहेरी आली आणि तिने संपूर्ण घटना तिची आई फूल कुमारी (45) यांना सांगितली. ५ जून रोजी मी तुझ्या सासरच्या घरी जाऊन याबाबत बोलते, असं फूलकुमारीने तिला सांगितलं. सुधा म्हणाली की आईने तिच्या सासरी जाताना तिला सोबत घेतलं नाही. नंतर ती आईची वाट पाहत राहिली. पण आईही घरी परत आली नाही.
पीडितेने सांगितलं की, ‘काही दिवसांनी मला समजलं की, माझी आई माझा सासरा बिराजी भगतसह फरार झाली आहे. दोघेही दिल्लीत राहतात. आता ना आई माझा फोन उचलते, ना कोणी माझ्याशी बोलतं. सर कृपया मला मदत करा,’ असं ती म्हणाली. सुधाने पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांनी छोटूशी संपर्क साधलं. यानंतर छोटूने पोलिसांना जे काही सांगितलं, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. छोटू म्हणाला, ‘माझ्या सासूने माझं लग्न माझ्या मेहुणीसोबत करून दिलं आहे. त्या बदल्यात ती मला कार आणि पैसे देईल, असं तिने सांगितलं होतं. मला दोन्ही पत्नींसोबत राहायचं आहे.’ याप्रकरणी पोलीस आता कारवाई करत आहेत