प्रज्वल पँरामेडिकल काँलेज येथे आंतरराष्ट्रिय योग दिवस उत्साहात साजरा
भंडारा– समता नगर फेज 2,गौतमबुध्द वार्ड येथे सुलभा बहु.शिक्षण संस्था द्वारा संचालित प्रज्वल पँरामेडिकल विद्यालयात 21 जून रोजी आंतरराष्ट्रिय योग दिवस महाएनजीओ फ़ेडरेशन पुणे व भाजपा सेवा प्रकोष्ठ आणि सुलभा बहुउद्देशीय शिक्षण संस्था भंडारा द्वारा करण्यात आले होते.
शेखर भाऊ मुंदड़ा संस्थापक महा.एनजीओ फ़ेडरेशन पुणे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात आतराष्ट्रिय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमात योग शिक्षिका डॉ सुलभा घरडे यांनी योगा चे महत्व सांगून प्रात्यक्षिका द्वारा योगा करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर डॉ बबन मेश्राम हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ, ललीता टोपरे, मनीषा बावनकर , रेणुका थोड़े छबी मस्के , पप्पी काबळे रश्मी वजारी, विना कामळे, रिना गजभिये आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना योगशिक्षिका व प्राचार्य डाँ. सुलभा घरडे यांनी यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ अशी आहे. यामध्ये महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कशा प्रकारे संतुलित राखले जाईल, याविषयीच्या माहितीवर भर दिला जाईल. ‘आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४’ हा दिवस साजरा करण्यासाठी आणि योगाच्या सरावाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक स्तरावर विविध कार्यक्रम आणि सत्रांचे आयोजन ही केले जातात असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा बावनकर यांनी केले. संचलन इंजि.रक्षा बोरकर यांनी तर आभारप्रदर्शन ललिता टोपरे यांनी केले.