अन यमराज सुटीवर असल्याचा आला प्रत्यय
उत्तराखंड / नवप्रहार डेस्क
नैसर्गिक संकट कधी येईल याचा काही नेम नसतो. भूस्खलन, भूकंप यासारख्या नैसर्गिक घटना कुठलाही काळ वेळ न पाहता घडतात. यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी आणि संपत्तीचे नुकसान होते. पण असे असतांना सुध्दा अगदी बोटावर मोजण्या ईतके लोक यापासून शिकवण घेतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओत अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीतून कार चालकाने प्रसंगावधान राखल्याने त्याला स्वतःला वाचवता आले आहे. २५ सेकंदांचा हा व्हिडीओ आहे, ज्यातील पाच सेकंद भयंकर आहेत. असं नेमकं काय घडलं ते पाहूयात . हा व्हिडीओ पाहिल्यावर यमराज नेमका यावेळी सुटीवर होता काय ? असा प्रश्न तुम्हालाही पडेल.
निसर्गापुढे माणूस तोकडाच
माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधी तरी त्या गर्वाचे घर खाली होते. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो. तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यंतर येते. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच वाचत असतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. उत्तराखंडमधील एका घाटामध्ये अचानक झालेल्या भूस्खलनामुळे मोठी हानी झालीय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचं धस्स होईल.
भूकंप, त्सुनामी, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक घटना अचानक घडतात. या नैसर्गिक घटनांमुळे किती लोकांना जीव गमवावा लागतो हे तुम्ही पाहिलेच असेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घाटात एक वाहनचालक गाडी चालवत आहे. त्याच्यापुढे आणखी काही गाड्या दिसत आहेत. थोडं पुढे गेल्यानंतर एक बोगदा येतो आणि तो बोगदा पार केल्यानंतर थोडं पुढे जाताच डोंगरावरून मोठ मोठे खडक, माती, दगड खाली कोसळू लागतात. हे पाहून हा चालक आपली गाडी तशीच रिव्हर्समध्ये मागे घेऊन जातो. तो उलट्याच दिशेने गाडी चालवून स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो, कारण हळूहळू डोंगराचा सगळाच भाग खाली कोसळताना दिसत आहे. थोड्याशा हुशारीने आणि येणारा धोका ओळखून चालकाने योग्य निर्णय घेत या संकटातून स्वत:बरोबरच इतरांनाही वाचवलं. अवघ्या १० फुटांवर आलेल्या मृत्यूला चकवा देऊन हा चालक माघारी फिरला.
यापूर्वी या घाटात अशा प्रकारचे अपघात झाले आहेत, त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या व्हिडीओवर अनेक जण संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत.