हटके

दाजीच मेहुनीवर जडलं प्रेम ; राहू लागले लिव्ह इन मध्ये 

Spread the love

जयपूर / नवप्रहार डेस्क 

           प्रेम हे कधीही आणि कोणाशीही होऊ शकतो. ते कुठंक्यही वयात होऊ शकते.प्रेम नाती गोती पाहत नाही. त्याला समाजाशी काही घेणे देणे नसते. नेमकं असंच या जोडप्याच्या बाबतीत घडलं. एक तरुणी चुलत बहिणीच्या नवऱ्याच्या प्रेमात पडली . आणि ते दोघे लिव्ह इन।मध्ये राहू लागले. तरुणी म्हणते की तिच्या बहिणीला तिच्या या प्रेमावर कुठलंही आक्षेप नाही. पण समाज त्यांच्या या कृत्याचा विरोध करत आहे.

चुरूच्या चालकोई गावातील पूजाने सांगितलं की, तिने 12वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. तिची चुलत बहीण बनारसी हिचा विवाह सुरेंद्रसोबत आठ वर्षांपूर्वी झाला होता. तिची बहीण आणि दाजी सुरेंद्र यांनाही 3 मुलं आहेत. सुरेंद्र गेल्या 13 महिन्यांपासून कामानिमित्त परदेशात राहत होता. नुकतीच चार महिन्यांची रजा घेऊन तो गावी आला होता. पूजा सांगते की, ती तिचा दाजी सुरेंद्र याला तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाच्या आधीपासून ओळखते.

दोघेही गेल्या तीन वर्षांपासून मोबाईलवर बोलत होते. तिचं दाजीवर प्रेम आहे. दाजीही तिच्यावर खूप प्रेम करतो. पूजाने सांगितलं की, तिला फक्त सुरेंद्रसोबत राहायचे आहे. सुरेंद्रलाही तेच हवे आहे. परदेशातून परतल्यानंतर दीड महिन्यापूर्वी 27 एप्रिल रोजी दोघेही घराबाहेर पडले. दोघेही चुरू, जयपूर आणि दिल्लीमार्गे गुजरातमधील वडोदरा येथे पोहोचले. त्यांनी तिथे बराच वेळ एकत्र घालवला. आता दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत

पूजा सांगते की, तिच्या बहिणीला या नात्यावर कोणताही आक्षेप नाही. सुरेंद्रही दोघींना एकत्र ठेवण्यास तयार आहे. तिने सांगितलं की तिच्या चुलत बहिणीला मालमत्तेत तिचा वाटा हवा आहे. याशिवाय तिला त्यांच्या नात्यावर कोणताही आक्षेप नाही. पण समाज आणि घरच्यांना हे पटत नाही. त्यांना धमक्या येत आहेत. भविष्यात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये. त्यामुळे ते पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरक्षा मागण्यासाठी आले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close