भाजपाने केला हिवरखेड येथील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील हास्य विद्यार्थ्यांची प्रेरणा- प्रविण राऊत
हिवरखेड:- (जितेंद्र ना फुटाणे):- भारतीय जनता पक्षाच्या वतीने हिवरखेड येथील नागोरावदादा सदाफळे नवोदय विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि सौ. गंगाबाई सीतारामजी चौधरी कन्या हायस्कूल हिवरखेड येथील सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी हे सामान्य शेतकरी व शेतमजूर कुटुंबामधील असून आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच विद्यार्थ्यांकरिता खरी प्रेरणा अशा प्रकारचे मत भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष प्रविण राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले
हिवरखेड येथील नागोराव दादा सदाफळे उच्च माध्यमिक विद्यालय तसेच महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड आणि सौ.गंगाबाई सीतारामजी चौधरी कन्या हायस्कूल हिवरखेड येथील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नवोदय विद्यालयाचे वेदांत अमोल गावंडे, ईश्वरी सुनील श्रीराव, नैतिक सुधिर ढोमणे, श्रेया संजय पाटणे, नंदिनी शेषराव ठाकरे, मुकेश मुन्नालाल धुर्वे तसेच महात्मा फुले हायस्कूलचे विद्यार्थी भाविका सुनील बोळाखे, भार्गवी किशोर गहुकर, रोहन किसनराव गावंडे, ईश्वरी विजयराव नेहारे, भूमिका प्रफुल्ल पाटील, अश्विनी महादेव पानसे तर सौ.गंगाबाई सीतारामजी चौधरी कन्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी निकिता रामसु उईके त्याचप्रमाणे त्यांच्या आई-वडिलांचा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रविण राऊत यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार सत्कार करण्यात आला.व त्यांना उत्तरोत्तर प्रगतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रविण राऊत भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष, निलेश शिरभाते मंडळ अध्यक्ष, गोपाल मालपे, सचिन तायवाडे उपसरपंच, मनोज मोकलकर, बाळासाहेब भोजने, संजय पाचघरे, रवींद्र श्रीखंडे, अंकुश धावडे, उत्तम उपासे,नानासाहेब पाटील,मोहनराव उमप,राजुभाऊ भोजने, निलेश गडेकर,मनोज सदाफळे,अक्षय नांदूरकर,जितेंद्र फुटाणे पत्रकार,विष्णुजी माकोडे,रुपेश आहाके तर महात्मा फुले विद्यालयाचे शिक्षक किशोर गहुकर आणि शशिकांत डेहनकर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.