राजकिय

सत्तेतून बाहेर पडा ; भुजबळांना कार्यकर्त्यांचे आवाहन

Spread the love

नाशिक  / नवप्रहार डेस्क

            राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणाला घेऊन ओढाताण सुरू आहे. जरांगे यांनी फजय सरकारला एक महिन्याच्या अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील आनंतरवाली सराटीच्या वेशीवर उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर समता परिषदेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत  कार्यकर्त्यांकडून भुजबळांना  राजीनाम्याचे आवाहन करण्यांत आल्याचे समजते.

छगन भुजबळ यांना लोकसभा आणि राज्यसभेवर डावलण्यात आलं. जरांगेंच्या मागण्या पूर्ण करून भुजबळ आणि ओबीसींवर अन्याय होत आहे. असा सगळा अन्याय होत असताना सत्तेत राहायचं का त्यावर निर्णय घ्या, अशी भूमिका समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. छगन भुजबळ यांना कार्यकर्त्यांकडून सत्तेतून बाहेर पडण्याचा आग्रह करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यास छगन भुजबळ मोठा निर्णय घेऊ शकतात. ओबीसींच्या आरक्षणासाठी शिवसेनेतून बाहेर पडल्याचा भुजबळांचा इतिहास आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

काय म्हणाले भुजबळ?

समता परिषदेच्या बैठकीनंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा भुजबळ आणि जरांगे यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच जातीनिहाय जनगणनेची मागणी करणार असल्याचंही भुजबळांनी सांगितलं आहे. जातीनिहाय जनगणना झाली तर ओबीसी नेमके किती हे समजेल, असं भुजबळ म्हणाले आहेत.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close