हटके

आईस्क्रीम च्या पॅक मध्ये जे सापडले ते वाचून तुम्ही आईस्क्रीम खाणेच आवडू शकता 

Spread the love

नवी दिल्ली  / नवप्रहार डेस्क 

           ऑनलाइन कुठली वस्तू मागावल्यास ग्राहकांना त्या वस्तूच्या नावावर भलतंच काही तरी पाठवण्यात आल्याच्या अनेक घटना आपण वाचल्या असतील. पण खाद्य पदार्थ मागावल्यास त्यात तसा प्रकार घडल्याचे क्वचितच घडते. पण अलीकडे आईस्क्रीम मागवल्यावर जो प्रकार घडला आहे ते वाचून तुम्ही आईस्क्रीम खाणे सोडुन देऊ शकता. 

  आईस्क्रीममध्ये असं काही सापडलं आहे की सर्वांना धक्का बसला आहे. किंबहुना फोटो पाहून अंगावर अक्षरशः काटा येतो आहे.महत्वाचे असे की याआधी आईस्क्रीममध्ये कापलेलं बोट सापडल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा हा प्रकार घडला आहे. एका प्रसिद्ध ब्रँडच्या आईस्क्रीममध्ये ही गोष्ट सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईतील मालाडनंतर दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये आईस्क्रीम बाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथं एका महिलेने ब्लिंकिटमधून आईस्क्रीम ऑर्डर केली. महिलेने आईस्क्रीमचा डबा उघडला आणि जे दिसलं ते पाहताच तिचं संपूर्ण शरीर सुन्न झालं.

आईस्क्रीममध्ये काय होतं?

दीपा असं या महिलेचं नाव आहे. नोएडाच्या सेक्टर-12 मध्ये ती राहते. शनिवारी सकाळी तिनं ब्लिंकिटवरून आईस्क्रीम ऑर्डर केली. तिनं सांगितले, प्रचंड उष्णतेमुळे तिच्या मुलांनी आईस्क्रीम खाण्याचा हट्ट केला. त्यामुळे तिनं 195 रुपयांचं अमूल व्हॅनिला मॅजिक आईस्क्रीम ऑर्डर केलं. ते उघडले तेव्हा आतमध्ये जे दिसलं ते पाहून ती खूप घाबरली. त्यात एक जिवंत घाण होती.

महिलेने ब्लिंकिटकडे याबाबत तक्रार केली. तिला ब्लिंकिटकडून परतावाही मिळाला आहे. ब्लिंकिट कस्टमर केअरने सांगितलं की अमूल व्यवस्थापक त्यांच्याशी संपर्क साधतील परंतु अद्याप अमूलकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

गुन्हा दाखल

या प्रकरणाची माहिती मिळताच अन्न आणि पुरवठा विभागाच्या पथकाने सेक्टर-22 येथील डिलिव्हरी ॲप स्टोअरमध्ये पोहोचून सर्व प्रकारच्या आईस्क्रीमच्या विक्रीवर बंदी घातली. आइस्क्रीम उत्पादक कंपनी आणि डिलिव्हरी ॲपवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचंही विभागाने म्हटलं आहे.

आईस्क्रिममध्ये ते कापलेलं बोट कुणाचं?

दरम्यान मुंबईत आईस्क्रिम कोनमध्ये सापडलेलं कापलेलं बोट कुणाचं याचा तपास सुरू आहे. अधिक पुष्टीकरणासाठी पोलिसांनी आइस्क्रीममध्ये सापडलेला मानवी शरीराचा भाग FSL (फॉरेन्सिक) कडे पाठवला आहे.

यम्मो कंपनीच्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्यानंतर कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे. तसंच याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील हडपसर परिसरात छापा टाकण्यात आला. आता हडपसर परिसरात असलेल्या या कंपनीत हे बोट कुठून आलं आणि ते कोणाचं आहे याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे अधिकारी चौकशी करत आहेत.

दरम्यान यावर यम्मो आईस्क्रीम कंपनीने उत्तर दिलं आहे. ‘आम्ही या आईस्क्रिमक थर्ड पार्टी उत्पादन करत होतो. ते आता थांबवलं आहे. तसंच आमच्या गोदामांमध्ये असलेले सर्व उत्पादन नष्ट करत आहोत. बाजारात असलेला माल परत घेत आहोत’, असं कंपनीने सांगितलं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close