एका पोलीस पाटलाकडे दोन गावांचा कारभार : दाखल्यांसाठी नागरिकांची वनवन.
…
अकोट उपविभागात अनेक गावांत पोलीस पाटलांची पदे रिक्त,
अकोट प्रतिनिधी
अकोट: ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था
राखण्यासाठी नागरिक व पोलीस प्रशासनातील महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील कार्य करीत असतात. त्यामुळे प्रत्येक गावात एक पोलीस पाटील असावा ही संकल्पना अंमलात आली. गावातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती त्वरीत पोलिसांना होण्याच्या दृष्टीने पोलीस पाटील या पदाला फार महत्त्व असून प्रतिष्ठा म्हणून या पदाकडे बघितले जाते. मात्र अकोट उपविभागातील अकोट व तेल्हारा तालुक्यात गेल्या काही वर्षापासून पोलिस पाटलांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांची दाखले मिळविण्यासाठी,
वनवन भटकंती सुरू आहे.
गावात कोणतीही घटना घडल्यास गावांमध्ये पोलिस त्वरीत पोहचू शकत नाही. त्यामुळे जुन्या काळापासून पोलिस पाटील नेमणुकीची पद्धत आहे. गावांत काय तंटे आहेत, अवैध व्यवसाय, इतर कायदा-सुव्यवस्थेची माहिती गावातील पोलिस पाटलांना असते. गावामधील सर्व घडामोडींवर पोलिस पाटलांचे बारीक लक्ष असल्याने काही… अनुचित प्रकार घडल्यास लगेच पोलिस यंत्रणेला माहिती मिळते. त्यामुळे पोलिसांना त्वरीत कारवाई करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणणे सुलभ होते. तर अनेक प्रकरणात गावातील तंटे गावात मिटविण्यात पोलिस पाटलाची भूमिका निर्णायक ठरते. परंतु अकोट उपविभागातील बऱ्याच गावांमध्ये ही पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. तालुक्यातील बहुतांश गावात पोलीस पाटील नसल्याने याचा त्रास नागरिकांना होत असून पोलीस पाटलाचा अत्यावश्यक असलेला दाखला मिळत नसल्याने नागरिकांची कामे होत नसल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी नागरिकांना दाखल्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तर काही पोलीस पाटलांना चक्क दोन गावांचा कारभार पहावा लागतो. अनेक गावांमध्ये पोलिस पाटील नसल्याने या गावांमध्ये काय चालते याची माहिती पोलिसांना मिळत नाहीत. पोलिस स्टेशन तालुक्याच्या ठिकाणी असल्याने त्या गावांमध्ये जावून दररोज पोलिस येऊन.
पाहणी करू शकत नाहीत. त्यामुळे या गावांमध्ये कायदा व.सुव्यवस्थेबाबत काय परिस्थिती..
आहे, याची सविस्तर माहिती पोलिसांना समजत नाही. प्रशासनाकडून पोलिस पाटलांची पदे परिक्षेव्दारे भरण्याची प्रक्रिया राबविली जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या पदांची भरती झालेली नाही. अकोट उपविभागात पोलिस पाटलांची अंदाजे २२५ पदे आहेत. त्यात केवळ अंदाजे १५० पोलिस पाटील कार्यरत आहेत. बऱ्याच गावांमध्ये पोलिस पाटीलच नाही किंवा त्या गावाचा प्रभार अन्य गावाच्या पोलीस पाटलाकडे देण्यात आलेला आहे. परिणामी तालुक्यातील अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन, दहीहांडा पोलिस स्टेशनच्या पोलिसांना गाव पातळीवरून माहिती देणारी व्यक्ती नसल्याने पोलिसांना कायदा व सुव्यवस्था रोखताना अमर्याद अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावस्तरावर पोलीस पाटलांची रिक्त असलेली पदे त्वरित भरली जावीत.. अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे…..