हटके

अन .. प्रेयसीसाठी त्याने आपला जीव टाकला धोक्यात

Spread the love
अमेरिका / नवप्रहार इंटरनॅशनल डेस्क
                    प्रेमात लोकं समोरच्या व्यक्तीवर जीव ओवाळण्याच्या गोष्टी करतात. पण खरोखर असा बिकट प्रसंग आला।तर प्रेयसीला एकटे सोडून पळून देखील जातात. पण अमेरिकेच्या एका प्रेमवीरांने आपल्या खऱ्या प्रेमाने फक्त प्रेयसीचे सरक्षणच केले नाही तर जनतेची वाहवा देखील मिळवली आहे.
               अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्निया च्या वाळवंटात जोशुंआ टी नॅशनल पार्क मधेएक प्रेमी युगल हायकिंग करण्यासाठी गेले होते. परंतु पाणीं संपल्यामुळे त्यांना त्याच ठिकाणी थांबावे लागले. यावेळी प्रियकराने प्रेयसी साठी आपला जीव लावला. ढाल बनून त्याने प्रेयसीचे रक्षण केले. रेस्क्यू चमूने त्यांना सुखरूप बाहेर काढले.
तरुणाने कॉल करून मागितली होती मदत – या तरुणाने 911 क्र. वर कॉल करून मदत मागितली होती. त्याने अधिकाऱ्यांना सांगितले होते की त्याच्या प्रेयसीच्या शरीरातील पाणी कमी  झाल्याने तीला अशक्तपणा जाणवत होता.त्यांच्या बद्दल ते पार्क च्या पेंटेड कैन्यन परिसरात असल्याचे समजल्यावर बचाव कार्य करणारी चमू या ठिकाणी पोहचली आणि हेलिकॉफ्टर च्या साह्याने त्यांना बाहेर काढण्यात आले.

                बचाव चमू घटनास्थळी पोहचली तेव्हा हे प्रेमी जोडपे पाणी नसलेल्या नदी काठी बसले होते. त्यांच्या वर उडणाऱ्या हेलिकॉफ्टर मध्ये बसलेल्या चमू ने बघितले की प्रेमी त्या रखरखत्या उन्हात प्रेयसी साठी ढाल बनून प्रेयसी चे रक्षण करीत आहे. रेस्क्यू चमूने त्यांना हेलिकॉफ्टर मध्ये घेऊन त्यांना सुरक्षित स्थळी आणले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close