सिने अभिनेता रामदास राऊत खाकी , लय भारी मराठी चित्रपटांमध्ये मंत्री शिवशंकर टोपे ची भूमिका साकारणार
.
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – अहमदनगर जिल्ह्यातून देशभक्तीवर आधारित , ‘ सदरक्षणाय खलनिग्रहणाय ‘ हे ब्रीद घेऊन खाकी जन्माला येते असे सांगणारे ..दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा आगामी खाकी… लय भारी या मराठी चित्रपटामध्ये सिने अभिनेता रामदास राऊत हे भ्रष्ट मंत्री शिव शंकर टोपे या खलनायकाची भूमिका साकारणार आहे .
या भूमिकेला पूर्णपणे न्याय देणार आहे , शेवटी राजकारणावरती व देशावरती चित्रपट म्हटल्यानंतर एखाद्या भ्रष्ट मंत्र्याची भूमिका असतेच व अशीच एक खतरनाक अशी नकारात्मक खलनायकी भूमिका दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी खाकी …लय भारी या मराठी चित्रपटामध्ये सिने अभिनेता रामदास राऊत यांना दिली आहे व या भूमिकेचे ते सोनं नक्कीच करणार आहे, पांडुरंग गोरे या दिग्दर्शकाचे चित्रपटाचे स्वप्न पूर्ण करणार आहे , या भूमिकेचा लेखाजोखा पाहता ही भूमिका या चित्रपटांमध्ये एक चित्रपटाला वेगळी कलाटणी देणारी आहे आणि या चित्रपटांमध्ये सस्पेन्स असल्यामुळे या मंत्र्याची भूमिका ते या चित्रपटांमधून रामदास राऊत अजर अमर करणार आहेत .
कलाकाराला भूमिका कोणतीही असो कोणत्या भूमिकेत शिरून त्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी कलाकार हा दिग्दर्शकाचा कलाकार असतो… यासाठी दिग्दर्शक, निर्माते व सिने अभिनेते असे चौफेर कामगिरी बजावलेले सिने अभिनेता रामदास राऊत यांची निवड दिग्दर्शक पांडुरंग गोरे उद्धव फंगाळ , कवी इंगळी सरकार संजय लहासे, उमेश वानखेडे यांनी लुक टेस्ट करून खुबीने केली आहे , खाकी… लय भारी या भव्यदिव्य मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभाचा मुहूर्त दि . १५ ऑगस्ट रोजी सिने अभिनेत्री ऋतुजा पाटील यांच्या हस्ते संपन्न होत आहे .
सिने लेखक , निर्माता , दिग्दर्शक , कवी , अभिनेते व खलनायक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले रामदास राऊत , यांनी आजपर्यंत अनेक , वेब सिरीज , शॉर्ट फिल्म , चित्रपट यात विविध अंगी भूमिका साकारून यशस्वी झालेले व पारनेर तालुक्याचे नाव चित्रपट क्षेत्रात गाजवलेले म्हसे खुर्द सारख्या ग्रामीण भागातील कलाकार आहेत , त्यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे .