उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षते खाली मानाच्या पालख्यांची नियोजन बैठक संपन्न
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील , यांजकडून ] – आषाढी वारीनिमीत्त मानाच्या पालख्यांची नियोजनाची बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथील विधानभवन मध्ये संपन्न झाली.
या बैठकीला पुणे,सातारा ,सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातील विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.या बैठकीला विभागीय आयुक्त, कोल्हापूर विभागीय पोलीस आयुक्त, पुणे,सोलापूर,सातारा तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तिन्ही जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक ,तिन्ही जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ,पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष गहिणीनाथ औसेकर,१० मानाच्या पालख्यांचे अध्यक्ष व सोहळाप्रमुख उपस्थित होते.
यावेळी वारकर्यांसाठी शासनाकडून ५ लाखाचा विमा दिला जाईल, असे सांगून उपमुख्यमंत्री ना.अजित पवार पुढे म्हणाले की , वारीमधे पिण्याचे पाणी,अँब्युलन्स, आरोग्यसेवा, टाॅयलेट सुविधा,पोलीस बंदोबस्त, पालखी मार्गाची डागडूजी आणि मुक्कामाचे ठिकाणच्या शासकीय इमारती व शाळांच्या इमारती आरक्षित करण्याचे ठरले.
यामधे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील श्रीसंत निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव सावंत,संत निळोबाराय पालखी सोहळाप्रमुख गोपाळकाका मकाशीर हेही उपस्थित होते , अतिशय खेळीमेळीत व सकारात्मक चर्चा झाली .