शेतकऱ्यांना पीक विमा द्या – संताजी अखिल भारतीय समाज संघटना
आर्वी / प्रतिनिधी
पिक विमा शेतकऱ्यांना तातडीने मिळावा, यासाठी संताजी अखिल भारतीय समाज संघटना शाखा आर्वी यांच्या वतीने वर्धा जिल्हयाचे विद्यमान खासदार श्री अमरभाऊ काळे व आर्वीचे विद्यमान आमदार श्री दादारावजी केचे साहेब यांना निवेदन देण्यात आले, त्यावेळी खासदार व आमदार साहेब. यांनी पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी भारताच्या संसदेत व विधानसभेच्या पटलावर. हा प्रश्न उपस्थित करून, देशाच्या पोशिंदयाला उचीत न्याय. मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन सदर शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिले, यावेळी शिष्टमंडळात प्रदेश उपाध्यक्ष श्री अविनाश टाके, नगर उपाध्यक्ष श्री अशोक. जिरापुरे, सामाजिक कार्यकर्ते. श्री प्रकाशभाऊ जैसिंगपुरे, ज्येष्ठ पत्रकार श्री सतिश भाऊ शिरभाते, माजी नगरसेवक श्री जीवन भाऊ आसोले, विनायक जैसिंगपुरे, संदीप लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते श्री पंकज भाऊ साकोरे, पवनभाऊ शिरभाते, रवींद्र गोडबोले, संदिप लोखंडे, व इतरही समाजातील घटक प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकरी बांधवांचा प्रश्न शेतकरी बांधवही निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.