सामाजिक

दोन शेतकरी बांधवांचा मुर्तिजापूर तालुक्यात अंगावर विज पडून मृत्यू

Spread the love

 

मूर्तीजापूर अनिल डाहेलकर

तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा वीस पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि.११ रोजी सायंकाळी ६ ते ६. ३० च्या सुमारास खापरवाडा व टीपटाळा इथे घडली आहे.
मूर्तिजापूर शहरासह तालुक्यात मंगळवार दुपारपासूनच वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकड्यात पाऊस झाला. यावेळी मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे २७ व टीपटाळा येथील शालिग्राम शिवराम डोंगरे ६५ वर्ष हे आपल्या शेतात काम करत असतांना अचानक त्यांच्यावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला.

दरम्यान मूर्तिजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे काही झाडे उन्मळून पडली तर झाडांचे पडझड झाल्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठा वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली तर पुढील उत्तरणीय तपासणी करिता मृतदेह श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे ठेवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनात मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस करीत आहेत

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close