देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा शपथविधीनंतर नांदगाव भाजपच्या कडूंन फटाकाच्या व ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा
नांदगाव खंडेश्वर / प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर फटाक्याच्या आतिषबाजीत व ढोल ताश्याच्या गजरात बस स्थानक परिसरात शपथविधीच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाद्वारे शपथविधी जल्लोष उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता महिला आघाडी नांदगाव खंडेश्वर तालुका व शहर च्या वतीने नांदगाव खंडेश्वर बस स्थानक परिसरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचे शपथविधी थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले व यानंतर येथे फटाक्याचे आतिषबाजी व ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित त्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीचा विजय असो नरेंद्र भाई मोदी तुम आगे बढो जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या तर यावेळी येथे भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र खंडाळकर, भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते घनश्याम सारडा,महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश पाठक तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे,शिवसेना तालुका प्रमुख सुधीर खंडार , शिवसेना संपर्क प्रमूख पुरुषोत्तम बनसोड, रुग्ण कल्याण समिती सदस्य मुन्ना जोशी, शहराध्यक्ष नवल खीची,भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल मानके,माजी नगराध्यक्ष संजय पोफळे, प्रा.उद्धव पारवे, नितीन जाधव, रूद्रेश शिंदे,तालुका उपाध्यक्ष उमेश चौकडे ,श्याम पाठक, सरचिटणीस अतुल जयसिंगपूरे,सतीश शृंगारे, माजी नगरसेवक अरुण लाहबर,अमोल मारोटकर,विलास धांडे, शिवसेना शहरप्रमुख मनोज जैन, मंगेश मानके धनंजय भडके निखिल मोरे सुधीर भडके बालू गव्हाणे अमित दहातोंडे प्रशांत मुरादे, अनिल शिरभाते,किशोर तायडे,तात्या सोळंके,नितीन काळे, निलेश जेठे, प्रदिप राऊत,यांच्यासह तालुक्यातील भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते