क्राइम

भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला ; 10 भाविकांचा मृत्यू 

Spread the love

जम्मू /! नवप्रहार डेस्क

           देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात बस चालकला गोळी लागल्याने त्याचे बस वरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळल्याने 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. घटनेबद्दल माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरू आहे. सोबतच दहशतवाद्यां विरोधात शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
वैष्णोदेवीपासून ८० किलोमीटर अंतरावर शिवखोरी हे धार्मिक स्थळ आहे. या भागात शंकर मंदिर असून देशभरातील भाविक या धार्मिक स्थळाला भेट देतात. रविवारी संध्याकाळी खासगी बसमधून भाविक देवदर्शन करून परतत होते. कटराच्या दिशेने ही बस जात होती.
रियासी जिल्ह्यातील चंडी मोडजवळ या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात बसचालक गंभीर जखमी झाल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली.
स्थानिकांच्या माहितीनुसार, संशयित दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. ज्या भाागात हा हल्ला झाला तो परिसर राजौरी आणि रियासी जिल्ह्याच्या सीमेवर आहे. सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. एकीकडे मदतकार्य सुरू असून दुसरीकडे दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम देखील सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close