सामाजिक

उपजिल्हा रुग्णालयाला घेऊन रुग्णमित्रगजू कुबडे यांचा आंदोलनाचा ईशारा

Spread the love

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालया आजारी
प्रहारच्या आंदोलनानंतरही जैसे थे स्थिती

हिंगणघाट /प्रतिनिधी
मोठे व्यापारी कामगार व शेतकरी वर्ग असलेल्या हिंगणघाट उपविभागात आरोग्याची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून छोटया मोठ्या आजरपणा साठी रुग्णांना बाहेरगावी जावे लागत असल्याने अनेक गरीब रुग्णांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागतं आहे.अनेकदा आंदोलन व निवेदन देऊनही प्रशासन निष्क्रिय होऊन तमाशा बघत आहे. यात गोरगरीब जनता मात्र विनाकारण भरडल्या जात असून या आरोग्यच्या गैर व्यवस्थेविरुद्ध पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे रुग्णमित्र गजू कुबडे यांनी दिलेला आहे.

यासंदर्भात गजू कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,मागील वर्षी 45 डिग्री तापमानात भर अनवाणी पायाने केलेल्या प्रायश्चित आंदोलनाची दखल घेत उपजिल्हा रुग्णालयात फक्त गर्भवती महिलांची सोनोग्राफी होते सामान्य रुग्णांना सोनोग्राफी साठी वर्धा,सेवाग्राम, सावंगी किंवा खासगी रुग्णालयात जावं लागते त्यामुळे गरजू रुग्णांना खूप मोठा आर्थीक भुर्दंड व मानसिक त्रास होतो आहे.हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात 3 वर्षांपासून सि. टी. स्कॅन मशीन पेटीबंध पडून आहे व या परिसरातील रुग्णांना सि. टी. स्कॅन साठी सेवाग्राम, वर्धा ,सावंगी किंवा नागपूरला जावं लागते त्यामुळे रुग्णांना व परिवारातील सदस्यांना आर्थिक व मानसिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे परंतु ही मशीन सुरु करण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्याची व्यवस्था करण्यात का येत नाही हे आणकलनीय आहे.
गेल्या दीड,दोन वर्षापूर्वी येथील लोकप्रतिनिधीने खूप मोठ्या थाटात उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर आय.सी.यु चे उद्घाटन करून लाखो रुपयांचा चुराडा केला परंतु उद्घाटन दिवसापासूनच मॉड्युलर आय.सी.यु हे कुलूप बंद आहे वारंवार सुरू करण्यासंदर्भात विचारणा केली असता आपल्या उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन डॉक्टर नसल्याचे कारण देण्यात येत होते परंतु आता उपजिल्हा रुग्णालयात डॉ.शिंदे फिजिशियन रेग्युलर असूनही मॉड्युलर आय.सी.यु. हे कुलूप बंद खोलीत धूळ खात आहे याचे रहस्य काय?ते त्वरित सुरू करावे
हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बोर्ड आहे त्या बोर्ड मध्ये आपल्या इथे फक्त हाडाचे रुग्णांनाच तपासले जाते बाकी फिजिशियन डॉक्टर यांच्याअंतर्गत येत असलेल्या (उदा. लकवा) अशा दिव्यांग रुग्णांना वर्ध येथे पाठविण्यात येत आहे.त्यां रुग्णांची येथल्याच मेडिकल बोर्ड मध्ये तपासले जावे कधी अपघाती रुग्णांना जिल्ह्याबाहेर रेफर केले असता व 108 रुग्णवाहिका उपलब्ध नसताना आपल्या रुग्णालयातील 102 ही रुग्णवाहिका रुग्णांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी 102 ही गाडी जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी नाही हे सांगून रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबवा तसेच आपल्या हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातच लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया तातडीने सुरू कराव्या अशी कळकळीची मागणी रुग्णमित्र गजू कुबडे यांनी केली आहे.
या सर्व बाबींवर योग्य कारवाई न झाल्यास प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गजू कुबडे यांनी दिलेला आहे.
निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा जिल्हाप्रमुख सुरज कुबडे, प्रहारचे माजी शहर प्रमुख अजय लढि, हेमंत महाजन सर,सतीश गलांडे,प्रशांत आवारी, सागर आत्राम,रितेश गुडधे, समीर मानकर,संकेत सातपुते, मयूर पुसदेकर,राजू पडोळे, विरु तोडसाम,दर्शन धानोरकर, इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close