हटके

घृणास्पद… फेस मसाज करतांना केला थुंकीचा वापर 

Spread the love
                    सोशल मीडियावर खाण्याचे पदार्थ तयार काडत असतांना त्यात आपली थुंकी मिसळण्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काहींनी तर हद्दच पार केली आहे. खाण्याच्या पदार्थात त्यांनी लघवी देखील केली आहे. या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांचा संताप अनावर होतो. सध्या सोशल मीडियावर लोकांचा पारा वाढवणारा असाच यरक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
                  सुंदर दिसण्याचा मोह हा सगळ्यानाच असतो.मग समोरचा व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष. सुंदर दिसण्यासाठी महिला ब्युटी पार्लर मध्ये जातात. तर पुरुष सेविंग करतांना फेस मसाज वगैरे करून घेतात. एका व्यक्तीकडून ग्राहकाची फेस मसाज करतांना त्याच्या थुंकीचा वापर करण्यात आला आहे. हा प्रकार पाहून नेटिझन्स चांगलेच संतांपले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शामली येथील थानाभवन परिसरातील मालिश करताना केस कापणार्‍याने थुंकीने एका तरुणाचा फेस मसाज करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. खरंतर सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये, केस कापणार्‍याने एका तरुणाच्या चेहऱ्यावर मालिश करताना दिसत आहे. हेच नाही तर मालिश करताना तो केस कापणार्‍याने आधी आपल्या हातावर थुंकतो आणि आपली थूंक त्या तरुणाच्या चेहऱ्यावर लावून मसाज करताना या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. दुसरीकडे जेव्हा व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे
।व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर एसपी अभिषेक यांनी सतीश कुमार यांना चौकशी व कारवाई करण्याचे निर्देश दिले. व्हिडीओच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओ प्रसारित करणार्‍या व्यक्तीने केस कापणार्‍यानाचे नाव अमजाद म्हटले आहे. एएसपी संतोष कुमार सिंग म्हणाले की, चौकशीनंतर कठोर कारवाई केली जाईल. तीन वर्षांपूर्वी, शामली कोटवली येथील फाउंटेन चौकाजवळ ओव्हनवर थुंकण्याचा व्हिडीओ प्रसारित केला गेला होता, या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close