निवड / नियुक्ती / सुयश

लिपीक तृप्ती गाडेकर ची अभियंता पदी निवड .

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – पारनेर भूमी अभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिक तृप्ती सुरेश गाडेकर यांची नुकतीच अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व ग्रामीण विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदी निवड झाली. लोणी मावळा व अळकुटी येथे नातलग असल्याने येथे कौतूक होत आहे .
नुकत्याच संपन्न झालेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे निवड झालेल्या तृप्ती गाडेकर या संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण ही येथीलच प्राथमिक शाळा व माध्यमिक शिक्षण ही ग्रामीण भागात झालेले असल्याने ग्रामीण भागातील मुलीच्या या यशा बद्दल लोणी मावळा येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नवनाथ शेंडकर , पाणी वाटप संस्थेचे चेअरमन संतोष शेंडकर , माजी सरपंच विलास शेंडकर , पारनेर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी सुरेश खोसे पाटील , गुरुवर्य प्राथमिक शिक्षिका वच्छला कावरे , बाळासाहेब ढमढेरे, ॲड. गोरख कान्होरे,आणि इतरांनी अभिनंदन केले आहे . तिच्या या यशाचे पारनेर तालुक्यात कौतूक होत आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close