नवचैतन्य संस्था शिरोली ची उन्हाळ्यात वृक्ष वाचवण्यासाठी धडपड
टाकाऊ पाणीबॉटल पासून वृक्षास पाणी पुरवठा उपाययोजना करुन वृक्षास जिवदान
घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
प्रत्येकाला उन्साहात सावली हवी पण,वृक्ष लागवड करण्यासाठी प्रत्येकच जण धडपडत नाही. नवचैतन्य संस्था मात्र यास अपवाद ठरत असून वृक्ष लागवड ते संगोपन, उन्हाळ्यात वृक्ष वाचवण्यासाठी वृक्षास सतत पाणी व्यवस्था करीत असते.लावलेल्या झाडांना जानेवारी ते जून पर्यंत पाण्याची व्यवस्था संस्था करीत असते. या वर्षात लावलेल्या एकूण ३० झाडांना रोज म्हणजे १५२ दिवस सतत पाण्याची व्यवस्था वनचैतन्केय संस्था शिरोली चे वृक्ष व निसर्ग प्रेमी राहूल जिरवणे यांनी अथक परिश्रम घेत केली आहे. दररोज १२ लिटर पाणी झाडांना दिल जाते.ते परिश्रम घेऊन दररोज वृक्षास पाणी देण्याची अभिनव पद्धत संस्थेने वापरली आहे. उन्हाळ्यात थंड पाणी पिण्या करिता लोक अनेक कंपनीचे पाणी विकत घेऊन पितात आणि त्या पाणी बॉटल तश्याच टाकून देतात. यामुळे पर्यावरणात प्लास्टिक मध्ये भर पडत असते. यावर उपाय म्हणून संस्थेने या बाटल्या जमा करून त्यावर प्रायोगिक तत्वावर काम करण्याचे ठरवले. त्या नुसार बाटलीच्या तळावरील भागास एक छिद्र पडून त्यात सुतळी टाकण्यात आली.या सुतळीला आजूबाजूला पडलेल्या खऱ्याच्या पन्नीने त्या सुतळीच्या मध्यभागी गुंडाळले या मुळे इतरस्थ बाटलीतील पाणी वाया जाणार नाही. उर्वरित सुतळी हि झाडांच्या बुडालगत सोडली. यामुळे सर्व पाणी हे झाडाच्या बुडाजवळ मुरेल. झाडाच्या बुडालगत असलेले पाणी बाष्पीभवन होऊं नये म्हणून झाडाच्या बुडाला खालच्या भागाला रान गवऱ्या त्यानंतर रान गवत झाकण्यात आले. यामुळे उन्हामुळे जमिनीवर असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही. सोबतच झाडाच्या बुडाला असलेल्या रान गवतना खाण्या करिता वेगवेगळे जीव या ठिकाणी पाहायला मिळाले. हे जीव जमिनीतून खालवर होत असल्याने झाडाच्या बुडालगतची जमील हि भुसभुशीत होत हे पाणी थेंब थेंब जात असल्याने व जमीन भुसभुशीत असल्याने झाडाच्या मुळा पर्यंत ऑक्सिजन जाते झाडांची मुळे वाढण्यास मोठी मदत होतांना पाहायला मिळाली. एकूणच त्या झाडाच्या बुडाला एक परिसंस्था निर्माण झाली.या आच्छदान मुळे जे मुळा लागत थंडावा निर्माण होते त्या थंडाव्याने मुंग्या, सापसुई, सरड्याचे पिलं, विविध प्रकाचे जीव आश्रय घेताना पाहायला मिळते.एका एक लिटर बाटलीतील पाणी १२ ते १५ तास पुरते. सोबतच झाडाच्या बुडालगत असलेला ओलावा आचछादना मुले १२ तास राहतो यामुळे झाडाला ४८ तासांनी पाणी दिल तरी चालते.
या प्रायोगिक तत्वावर काम करण्या करिता अमोल नीलकंठ गायकवाड यांनी बाटल्याचे संकलन करण्यास मदत केली तर सुतळी करीता वैभव सुभाष सोनटक्के या दोन तरुणाने मदत केली. या कामा करिता राहुल जीवने यांनी तांत्रिक परिश्रम घेतले व मुख्य मार्गदर्शक सुभाष मानकर याचे मिळाले. या निसर्ग प्रेमी उपक्रमास जनतेतून स्तुती होत आहे.
०००००००००००००००००००