तेल्हारा मध्ये बियाणे महोत्सवाला शेतकऱ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तेल्हारा / प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यामध्ये रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी तालुका कृषी अधिकारी
कार्यालयाच्या प्राणांगणामध्ये बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते.या बियाणे महोत्सवाला तालुक्या तील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प संचालक आत्मा डॉ.मुरली इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री समाधान सोनवणे तहसीलदार तेल्हारा तालुका यांची उपस्थिती होती . कार्यक्रमात मान्यवरांनी फीत कापून महोत्सवाची सुरुवात केली. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व मालयार्पण करून कार्यक्रमा ची सुरुवात करण्यात आली. याकार्यक्रमां मध्ये तालुक्या तील एकूण 35 शेतकऱ्यांनी आपले घरगुती सोयाबीन, तूर, उडीद,मूग बियाणे विक्री चे स्टॉल लावले होते. त्यामध्ये सकाळी 9 वाजता पासून ते संध्याकाळ पर्यंत शेतकऱ्यांनी विविध स्टॉलला भेट देऊन बियाणे खरेदी व बुकिंग केले. या कार्यक्रमाच्या वेळी
उपस्थित सर्व शेतकऱ्यांना उगवण शक्तीचे प्रात्यक्षिक व बीज प्रक्रिया व त्याचे महत्त्व याकरता बीज प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी मार्केटमध्ये उपलब्ध असलेला बियाण्याचे असलेल्या उच्च दर व कमी उपलब्धता यामुळे खर्च वाढू शकतो त्यामुळे उत्पादन खर्च कमी करणे करिता सर्व शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे वापरावे. येथे उपलब्ध असलेले सर्व बियाणे कृषी विभागामार्फत उगवण शक्ती तपासलेले असल्याने खात्री शीर व उच्च गुणवत्तापूर्व बियाणे आहेत त्यामुळे आपण संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून बियाण्याची खरेदी करावी किंवा त्याची बुकिंग करावी अशी सर्वांना त्यांनी विनंती केली. प्रस्तावनामध्ये
तालुक्यामध्ये झालेल्या उगवनशक्ती तपासणी व बीज प्रक्रिया मोहीम याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले तालुक्याचे तहसीलदार समाधान सोनवणे यांनी सर्व उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागा च्या या स्तुत्य उपक्रमामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रमाणात घरगुती बियाणे लावावे याकरता आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रकल्प संचालक आत्मा डॉ मुरली इंगळे यांनी शेतकऱ्यां ना सोयाबीन पिकाच्या विविध लागवड पद्धती त्यामध्ये असलेले बीज प्रक्रियेचे महत्त्व आणि सोयाबीनचे मूल्य संवर्धन याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले आपण फक्त धान्य उत्पादक न होता बियाणे उत्पादक व्हावे व जेणेकरून आपल्या मालाला उत्तम भाव मिळेल असे आवाहन त्यांनी या मोहोत्सवामध्ये केले. शेतकरी प्रतिनिधी म्हणून मंचावर उपस्थित असलेले श्री दिनकर ढोले यांनी हा महोत्सव आयोजित केल्याबद्दल कृषी विभागाचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानून आम्ही सर्व शेतकरी घरगुतीच बियाणे वापरणार असा निर्धार व्यक्त केला. या महोत्सवामध्ये मंचावर मंडळ कृषी अधिकारी सौं रंजना देशमुख, श्री गजानन नागे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनोज कुमार सारभूकन यांनी केले. यावेळी तालुक्यातील सन्माननीय पत्रकार बंधू,कृषी निविष्ठा विक्रेते आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीते करता कृषीविभागा तील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केले