पालकमंत्री यांचे आदेशाने भाजपचे जिल्हा अध्यक्ष हरीशजी शर्मा यांनी विरुर(स्टेशन)च्या प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली भेट
राजुरा :-राजुरा तालुक्यातील विरुर(स्टेशन)येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी एक महिन्यापासून संपावर गेल्याने रुग्णाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे हे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाला यांचे पाहणी दरम्यान लक्ष्यात आले असता त्यात रुग्णांची होत असलेले दुर्लक्ष्य पाहून त्यांनी त्वरित पालकमंत्री मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून कर्मचारी अभावी रुग्णाची होत असलेली हेळसांड त्यांच्या लक्ष्यात आणून दिली त्यावेळी मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी ही समशा गांभीर्याने लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा यांना विरुर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्यास सांगितले त्यावेळी विरुर (स्टेशन)येथील भाजपा कार्यकर्ते श्री. सतीश कोमरवेलीवर, सर्कल अध्यक्ष, श्री. सुरेंद्र वेलादे आदिवासी समाज अध्यक्ष भाजपा, श्री. प्रदीप पाला ग्रामपंचायत सदस्य, श्री. भीमराव पाला शहर अध्यक्ष, श्री. रामावतार सोनी, श्री. श्यामराव कस्तुरवार व इतर कार्यकर्ते यांचे उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल लांडे यांचे सोबत चर्चा करून संबंधित समशा जाणून घेतल्या व कंत्राटी कर्मचारी यांचे यांचे मानधन लवकर देण्या संदर्भात मा. पालक मंत्री यांना कडवू आणि कंत्राटी कर्मचारी लवकर पुन्हा कामावर रुजू होतील असे आश्वासन भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या कडून देण्यात आले या वेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते