संत भिमा भोई जयंती सोहळ्यात समाजसेवक सुरज मेश्राम यांचा भोई समाजातर्फे भव्य सत्कार
नांदगांव खंडेश्वर- / प्रतिनिधी
विदर्भ भोई समाज सेवा संघाच्या वतीने संत भीमा भोई जयंती सोहळा निमित्त धामणगाव रेल्वे येथील समाजसेवक सुरज बाबूलाल मेश्राम यांचा नांदगाव खंडेश्वर येथे भव्य सत्कार करण्यात आला. सुरज मेश्राम यांचा भोई समाजातील युवकांना एकत्रिकरण, भोई समाजकार्याबद्दल व गौरक्षा सेवेबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. भोई समाज हा आताही उपेक्षितचं असून ,समाजात बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात आहे. अडीच टक्के आरक्षणात काहीही होत नाही; त्यामुळे समाजातील युवकांना सरकारी नोकऱ्यांना मुकावे लागते.आता भोई समाजातील युवकांनी एकत्र येऊन आरक्षणासाठी लढा द्यावा. पुढे भोई समाजासाठी माझी अविरत सेवा सुरू राहील. भोई समाजातील सर्व पोटजातींनी आता एकत्र येऊन समाजाच्या उन्नतीसाठी जेव्हा प्रयत्न करतील;तेव्हाच भोई समाजाची उन्नती होईल. हा सत्कार केवळ माझा नसून माझ्या संपूर्ण भोई समाजाचा आहे व भोई समाजातील युवकांना एकत्र येण्याचे आवाहन सुरज मेश्राम यांनी केले. समाजाचा उन्नतीसाठी मी मनापासून प्रयत्न करेल असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून केले.