हटके

गेमिंग झोन वाले पहिलेच घेत होते ग्राहकांच्या मृत्युपत्रावर स्वाक्षरी 

Spread the love
घटनेवर हायकोर्ट ने ओढले ताशेरे 
राजकोट / नवप्रहार डेस्क
             TRP गेमिंग झोन अग्निकांड प्रकरणात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या गेमिंग झोन मध्ये येणाऱ्या ग्राहकां कडून एक फॉर्म भरून घेतला जात होता. त्यावर त्यांच्या ज्या शर्ती आणि अटी होत्या त्यात त्यांनी या गेमिंग झोन मध्ये येणाऱ्या ग्राहकांना या ठिकाणी होणाऱ्या सर्व गोष्टीसाठी ग्राहकानाच जबाबदार धरले आहे.
              काल संध्याकाळी राजकोट येथील TRP गेमिंग झोन मध्ये अचानक लागलेल्या आगीत 28 बालकांचा होरपळुन मृत्यू झाला आहे. यानंतर उच्च न्यायालयाने याची दखल घेत गेमिंग झोन चालकासह सहा लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
काय म्हणाले उच्च न्यायालय – या घटनेची दखल उच्च न्यायालयाने स्वतः घेतली आहे. हाय कोर्ट चे जस्टिस बीरेन वैष्णव आणि जस्टिस देवेन देसाई यांनी म्हटले आहे की या घटनेला मानव निर्मित घटना संबोधले आहे. त्यांनी घटनेवर टिपणी करतांना म्हटले आहे की गेमिंग झोन ची निर्मिती करताना नियमांकडे लक्ष दिले गेले नाही. अहमदाबाद, वडोदरा, सूरत आणि राजकोट नगर पालिकेला यावर स्पष्टीकरण मागितले आहे. कोर्टाने त्यांना म्हटले आहे की त्यांना कोर्टाला सांगावे लागेल की त्यांनी कोणत्या नियमा अंतर्गत  अश्या गेमिंग झोन ला परवानगी दिली.
राजकोटच नव्हे तर अन्य ठिकाणचे गेमिंग झोड आहे असुरक्षित – सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार फक्त राजकोटच नव्हे तर अहमदाबाद शहरात देखील असे काही गिंग झोन आहेत की जे असुरक्षित आहेत.
ग्राहकांच्या पहिलेच नियम आणि शर्तीच्या फॉर्म वर घेतल्या जात होत्या सह्या – सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांकडून एक फॉर्म भरल्या जात होता. त्यात असे नमूद होते की कुठल्याही संकटां मुळे उद्भवणाऱ्या शारीरिक हानी, अन्य नुकसानी साठी मी स्वतः जबाबदार राहील. मला मृत्यू जरी आला तरी त्यासाठी मलाच जबाबदार धरण्यात यावे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close