हत्याकांडातील दोन आरोपी 13 वर्षानंतर गवसले
दोघेही बनले होते साधू , एक करत होता मंदिरात पूजा तर दुसरा विकत होता जडीबुटी
सागर / नवप्रहार डेस्क
” कानून के हाथ बहोत लंबे होते है ” हा डॉयलॉग तुम्ही ऐकला असेलच. पण यात 100% सत्यता आहे.एखादं दुसरे प्रकरण सोडले।तर पोलीस अनेक वर्षांनी का होईना आरोपीचा शोध लावतातच.फक्त संबंधित अधिकाऱ्यांच्या डोक्यात ही बाब आली पाहिजे. आता या प्रकरणाबद्दल बोलायचे झाले तर पोलिसांनी खुनाच्या 33 वर्षानंतर आरोपींचा शोध लावला आहे. मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात 1991 मध्ये हा खून झाला होता.
1991 मध्ये झालेल्या हत्याकांडातील दोंन्ही आरोपी फरार होते.पोलिसांनी अखेर त्यांना अटक केली आहे.विशेष म्हणजे यातील एक आरोपी इंदूरमधील जामगेट-महू येथील पार्वती मंदिरात भगवे वस्त्र परिधान करून साधू बनला होता.तर दुसरा आरोपी नागपुरात जडीबुटी विकत होता.तब्बल 13 वर्षे फरार असणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून दोघांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मछरिया गावात शेतात गुरे घुसल्याच्या वादातून 33 वर्षांपूर्वी बाबूलाल पचौरी या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती.प्रभू दयाळ पचौरी आणि उमाशंकर तिवारी असे आरोपींचे नाव आहे.या दोघांनी बाबुलाल पचौरी यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली होती.या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षेची माहिती मिळताच दोघेही पळून गेले. दोघांच्या अटकेसाठी अटक वॉरंट जारी करण्यात आले. दोघेही गेल्या 13 वर्षांपासून फरार होते. पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी दोन्ही फरार आरोपींना अटक करण्यासाठी 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.अखेर दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिस ठाण्याचे प्रभारी रोहित डोंगरे यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली होती.माहितीच्या आधारे आरोपी प्रभूदयाल पचौरी(67) याला इंदूरजवळील जामगेट येथील एका देवी पार्वतीच्या मंदिरातून अटक करण्यात आली.आरोपी भगवे कपडे परिधान करून मंदिरात महंत सिद्धेश्वर नावाने वावरत होता.तर दुसरा आरोपी उमाशंकर तिवारीला महाराष्ट्रातील नागपुरातून अटक करण्यात आली.आरोपी उमाशंकर तिवारी हा नागपुरात जडीबुटी विकत होता.या दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.