ग्रामीण क्षेत्रातील मुलीची उंच भरारी; प्रतिकूल परिस्थिति वर मात करत 12 वी मधे मिळवले 90.17% गुण।
मोलमजुरी करणाऱ्या पालकांच्या मुलीचे नेत्रदीपक यश
भिलटेक / गौरव मामुलकर
नुकताच 12 वी चा निकाल जाहीर झाला आहे. यात अशोक विद्यालय चांदुर रेल्वे येथे अहिकाहन घेणाऱ्या श्रावणी ने वाणिज्य शाखेत नेत्रदीपक यश मिळवत महाविद्यालया सह गावचे नाव रोशन केले आहे. तिने वाणिज्य शाखेत 90.17 % गुण मिळविले आहे. श्रावणी चे आईवडील मोलमजुरी करतात. घरात कुठल्याही सोयीसुविधा नसतांना सुद्धा श्रावणी ने मिळविलेले यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
वर्ग 12 वी चा निकाल मे 21, 2024 ला जाहीर झाला. खूप विदयार्थांनी भरघोंस यश सम्पादन केले. अमरावती जिल्ह्यातील चांदूर (रेल्वे) तालुक्यातील भीलटेक येथील रहिवासी श्रावणी सुधाकर तायडे ह्या विद्यार्थीनीने 90.17% गुण प्राप्त करत सम्पूर्ण गावाचे व कॉलेज चे नाव लौकिक केले. श्रावणी च्या घरची परिस्थिति दारिद्र्याची, आई-वडील शेती-मोलमजूरी वर घर कारभार चालवतात. मोठा भाऊ कृषि क्षेत्रात शिक्षण घेत आहे. श्रावणी चांदूर (रेल्वे) मधील अशोक महाविद्यालयामधे शिक्षण घेत होती. चांदूर (रेल्वे) ते भीलटेक अंतर 12 किलोमीटर चे आहे. श्रावणी रोज कॉलेज ला एसटी बस ने ये-जा करायची. शिक्षणात येणार्या प्रत्येक अडचणी वर मात करत व कुठल्याही परिस्थितिला न डगमगता अभ्यासाची जिद्द मनात ठेवून श्रावणी ने हे भरघोंस यश सम्पादन केले आहे. श्रावणी च्या या यशाचे कौतुक धामणगाव विधानसभा माजी आमदार विरेन्द्रभाऊ जगताप यांना पण आवरले नाही. माजी आमदार विरेन्द्रभाऊ जगताप यांनी श्रावणी च्या घरी जाऊन तिचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. श्रावणी ला पुढे संघ लोक सेवा आयोग परिक्षेची तयारी करायची आहे असे सांगितले. श्रावणी ने तिच्या यशाचे श्रेय तिचे आई-वडील व तिच्या गुरुजनांना दिले.