सामाजिक

बंधाऱ्याचे बांधकामाधीन कार्य अजूनही जैसे थे ..!

Spread the love

 

ऐन पावसाळा तोंडावर असतांना शेतकऱ्यांची गैरसोय*

कंत्राटदाराविरोधात नितीन कदम यांची आंदोलनाची तयारी*

प्रतिनिधी / अमरावती

भातकुली तालुक्यातील खरबी गावाच्या नाल्यावरील वाहणाऱ्या पाण्याच्या बंधाऱ्याचे बांधकामाची परिस्थिति ‘जैसे थे’ असून नागरिकांसह संकल्प शेतकरी संघटनेने सदर कंत्राटदाराविरोधात रोष व्यक्त केला आहे. गेल्या वर्षापासूनच रखडलेल्या दिवसागणिक पाण्याची पातळी खालवत चालली असून सिंचन विहिरी,व पिण्याचा पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजना ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत. या बंधाऱ्याचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. खरबी येथून वाहणाऱ्या नाल्यावरील वरील बंधाऱ्याचे बांधकाम अंदाजे ६ ते ७ महिन्यापासून रखडल्याने दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली आहे. सिंचन विहिरी व पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजना ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत. या बंधाऱ्याचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली असता कंत्राटदाराच्या मुजोरीपूर्ण उत्तरामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. वाहते पाणी अडवून त्याचा साठा करून भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ करणे व त्याचा सिंचनासाठी वापर करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे, सोबतच पिण्याची पाणी समस्या दूर करणे आदी बाबी विचारात घेऊन तालुक्यातील खरबी बंधारा मंजूर करण्यात आला. ६ महिन्याआधी भूमिपूजन करून बांधकामही सुरू करण्यात आले. मात्र ६ महिने उलटल्यानंतरही ठराविक कालावधीत बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. सदर नाल्याचे पात्र कोरडे पडल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. सिंचन विहिरी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नाल्यावर अवलंबून असलेल्या नळ योजना ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत. आज भातकुली तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हंडाभर पाण्यासाठी चार-चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.दरम्यान प्रशासनाने सदर प्रश्नावर मौन बाळगणे पसंत केले आहे . नागरिकांनी/शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी देऊनही बांधकामाची परिस्थिति जैसे दिसून येत आहे.संबंधीत अधिकाऱ्यांनी बांधकामअधीन ठिकाणी भेट दिली असता अधिकाऱ्यांचेही वचक कंत्राटदारवर नसल्याचे लक्षात आले. कंत्राटदाराची मुजोरी व या प्रकरणी होणारा राजकीय हस्तक्षेप यामुळे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आगामी पावसाच्या ऋतुमध्ये पाण्याचे व्यवस्थापन पूर्ण झाले नाही तर शेतकऱ्यांची होणारी पंचाईत टाळता येत नाही.शासनाच्या निविदेप्रमाणे एका विशिष्ट कालावधीत निर्माणकार्य पूर्ण होण्याच्या सूचना व निर्देश असतात . परंतु ठराविक कालावधी ओलांडल्यानंतरही निर्माण कार्य ठप्प दिसून येत आहे. कंत्राटदाराची मुजोरी व हलगर्जी त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधीची जाणीवपूर्वक उदासीनता यामुळेच निर्माण कार्य ठप्प असण्याची चर्चा आता परिसरात पसरायला लागली आहे. येथील बंधाऱ्याची निर्माण कार्याचा आढावा घेण्याकरिता संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम व पदाधिकाऱ्यांनी स्वत पाहणी केल्यानंतर सदर गैरप्रकार मोठ्या स्वरूपाचा असल्याचे लक्षात आले. लोकप्रतिनिधी व अधिकारी या प्रकरणाबाबत अजूनही का शांत आहे असा सवलाही उपस्थित होतोय. येथील बांधकामचा कालावधी पूर्ण झाला असून आणखी पुढचे १५ दिवसात निर्माणकार्य पूर्ण न झाल्यास कंत्राटदारविरोधात आंदोलन करीत बांधकाम परवाना रद्द करण्यासंबंधीची मांगणी प्रशासनाला करणार असल्याचे मनोगत नितीन कदम यांनी व्यक्त केले. यावेळी खरबी गावातील नागरिक , संकल्प शेतकरी संघटनेचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close