क्राइम
महिला तहसीलदार गीतांजली गरड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

चांदुर बाजार / प्रतिनिधी
शेतीचा फेरफार घेण्यासाठी संबंधितांकडून लाचेची मागणी करणे लिपिक आणि तहसीलदार गीतंजली गरड यांना चांगलेच महागात पडले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच स्वीकारणाऱ्या खाजगी इसमाला ताब्यात घेतले आहे.
थोडक्यात हकिकत यातील तकारदार यांनी दिनांक २८/०३/२०२४ रोजी तकार दिली की, त्यांचे वडीलांचे नावे असलेल्या शेतीचे वाटणीपत्रानुसार फेरफार करणेबाबतचा आदेश काढून देणेकरीता श्री. किरण बेलसरे, लिपीक, तहसिल कार्यालय, चांदूर बाजार, जि. अमरावती यांनी स्वतः करीता व तहसिलदार श्रीमती गरड यांचेकरीता २५,०००/- रुपये लाचेची मागणी करीत आहेत.
सदर तकारीवरुन दिनांक २८/०३/२०२४ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दम्यान श्री. किरण बेलसरे यांनी तडजोडीअंती २०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले. तसेच दिनांक ०८/०५/२०२४ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान श्रीमती गितांजली गरड, तहसिलदार, चांदूर बाजार, जि. अमरावती यांचे श्री. किरण बेलसरे, खाजगी इसम यांना लाच देण्यास प्रोत्साहन असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वरुन नमुद दोन्ही आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन चांदूर बाजार, अमरावती ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे… सदरची कार्यवाही मा. श्री. मारुती जगताप, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
अमरावती परिक्षेत्र, श्री. अनिल पवार, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही श्री. मिलींदकुमार बहाकर, पोलीस उपअधिक्षक, श्री. मंगेश मोहोड, पोलीस उप अधीक्षक, श्रीमती विजया पंधरे, पो.नि. श्रीमती चित्रा मेसरे, पो.नि.पो. हवा. प्रमोद रायपुरे, ना. पो. कॉ. युवराज राठोड, नितेश राठोड, महेंद्र साखरे, पो. कॉ. उमेश भोपते, वेभव जायले, ला.प्र.वि.अमरावती, चालक सपोउनि बारबुध्दे, किटकूले यांनी पार पाडली.
नागरीकांनी अशाच प्रकारे भ्रष्टाचारा संबंधीतकार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
संपर्कः अॅन्टी करप्शन ब्युरो, ललीत सेंटर, परांजपे कॉलनी, अमरावती, ऑफीस फोन नं. ०७२१-२५५३०५५, मो.न.७७४१९६७०४१ टोल फि नंबर-१०६४.