शैक्षणिक

श्री. गा. म. कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मुर्तिजापूर चा HSC परीक्षेचा १००% निकाल

Spread the love

 

मुर्तिजापूर (वार्ताहर) मुर्तिजापूर येथील श्री गाडगे महाराज कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने HSC 2024 परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली . परीक्षीत शेलोरकर याने 89.83% गुण मिळून महाविद्यालयातून प्रथम तसेच तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला . द्वितीय क्रमांक कु. ज्ञानेश्वरी कडू व सिद्धांत नागदेवते यांनी 87.17% गुण तर अनिकेत गावंडे याने 87% गुण प्राप्त करून यश संपादन केले . तसेच 23 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उतीर्ण झाले व 71 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण झालेत . यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार ॲड भैय्यासाहेब तिडके व सचिव मा. शिरीषभाऊ तिडके यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. विलास खाडे, पर्यवेक्षक श्री. श्याम कोल्हाळे तसेच प्रा. अनासाने , प्रा. मानकर , प्रा तिडके , प्रा. टोपले , प्रा. लांडे व सर्व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close