विशेष

अन चक्क ऑक्टोपस ने नेले तिला रहस्यमय वस्तू जवळ

Spread the love

                    मानवा पेक्षा प्राण्यांना कुठल्याही गोष्टीची चाहूल लवकर लागते. जगावर येणाऱ्या संकटाचे संकेत प्राणी पहिलेच देतात.।पण प्राण्यांची भाषा मनुष्याला समजत नसल्याने मनुष्य त्यांनी दिलेले संकेत समजू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत ऑक्टोपस महिलेचे हात पकडून तिला काहीतरी संकेत देतो. पण ती हाताला झटका मारून त्याला बाजूला सारते. पण पुन्हा पुन्हा तो तिच्याकडे येत असल्याने ती त्याच्या मागे जाते. तर तो तिला समुद्राच्या आत असलेल्या आणि स्टील च्या खांबाने बांधलेल्या कबरी कडे घेऊन जातो..अर्थात ती रहस्यमय वस्तू काय आहे हे समजत नाही.

 अशा अनेक ऐतिहासिक कथा-किस्से तुम्ही ऐकले असतील, ज्यात शेकडो हजारो वर्षांपूर्वी खजिन्याने भरलेली जहाजे समुद्रात अचानक बेपत्ता झाली किंवा बुडाली आहेत.

अनेक वेळा मानवाला अशाच जहाजांमध्ये दडून ठेवलेला खजिना जाणूनबुजून किंवा नकळत सापडतो. असाच काहीसा प्रकार एका महिला डायव्हरसोबत घडला. ती काही कामासाठी समुद्राच्या खोलात गेली होती, तिथे तिला खजिना सापडला. विशेष बाब म्हणजे, हा खजिना शोधण्यात तिला चक्क एका ऑक्टोपसने मदत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाची रहिवासी ज्युल्स केसी समुद्रात डायव्हिंगसाठी गेली होती, यावेळी एका ऑक्टोपसने तिचा हात पकडला आणि तिला थेट समुद्राच्या तळाशी दडलेल्या खजिन्याकडे नेले. एका पुरस्कार विजेत्या फोटोग्राफरने हा चमत्कारीक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या अनुभवाबाबत ज्यूल्स सांगते की, ऑक्टोपस वारंवार तिचा हा पकडून तिला कुठेतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला तिने हात झटकायचे प्रयत्न केले, पण शेवटी ती ऑक्टोबसच्या वाटेवर गेली. ऑक्टोपस तिला स्टीलच्या खांबांमध्ये बांधलेल्या एका कबरीकडे घेऊन गेला. कबर पाहून ज्युल्सला आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे, कबर दाखवल्यानंतर ऑक्टोपस तिथून नाहीसा झाला. त्या कबरीजवळ खजिनाच होता की आणखी काही, हे ज्युल्सने उघड केले नसले तरी, एका ऑक्टोपसने हात धरुन खजिना दाखवणे खरोखरच चमत्कारापेक्षा कमी नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close