क्राइम
अल्पवयीन पत्नी आणि तिच्या प्रियकराने केला ” खाताराम ” चा ” खात्मा ”
एक वर्ष सापडू दिले नाही पुरावे
बाडमेर ( राजस्थान ) / नवप्रहार डेस्क
अल्पवयीन मुली सुद्धा क्राईम केल्यावर एखाद्या सराईत गुन्हेगारा प्रमाणे पुरावे नष्ट करू शकतात हे राजस्थान च्या बाडमेर जिल्ह्यात घडलेल्या एका खुनाच्या घटने नंतर समोर आले आहे. अल्पवयीन मुलीने आपल्या प्रियकरा सोबत मिळून पतीचा खून करून मृतदेह अश्या ठिकाणी लपवला की पोलिसांना देखील एक महिना त्याचा शोध घेता आला नाही. शेवटी निवडणुकीच्या काळात गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने पोलिसांना आपले कसब पणाला लावावे लागले. तेव्हा कुठे जाऊन या खुनाचा छडा लागला.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मागच्या वर्षी मे महिन्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न खरताराम सोबत झाले होते. बायकोच्या वागण्यावरून त्याला तिचे कोणाशीतरी अवैध संबंध आहेत अशी शंका आली होती. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडण व्हायचे. रोजच्या कटकटीला कंटाळलेल्या पत्नीने आपल्या पतीचा नेहमी साठी काटा काढण्याचे ठरवले.तिने ही बाब तिचा प्रियकर दिनेश च्या कानावर टाकली. त्यांनी झोपेत असलेल्या खातारांम च्या गळ्यावर चाकू चालवून त्याची हत्या केली.
मृतदेह प्लास्टिक मध्ये गुंडाळून फेकला व रोज त्या ठिकाणाहून मारायचे चकरा – दिनेश आणि त्याच्या अल्पवयीन प्रेयसी ने खाताराम चा खात्मा केल्यावर मृतदेह प्लास्टिक मध्ये गुंडाळून लपवून ठेवला. हे दोघे आपले कृत्य लपवण्यासाठी किती काळजी घेत होते हे यावरूनच लक्षात येईल की या दोघांनी खाताराम चे प्रेत ज्या ठिकाणी पुरले होते. त्या ठिकानी हे दोघे जाऊन मृतदेहाला दुर्गंधी सुटली काय ? हे तपासण्यासाठी याठिकानी दररोज चकरा टाकत असत.
पोलीस विचारपुस मध्येही फुटली नाही पत्नी – खाताराम बेपत्ता असल्याने त्यांच्या वडिलांनी पोलिसात जाऊन तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला. इतकेच काय तर पत्नीची विचारपूस केली. तीने तोंडातून ब्र देखील काढला नाही.

दिनेश खाताराम चा मारेकरी
गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यावर झाला घटनेचा उलगडा – मागील एक वर्षांपासून प्रकरण तपासात होते. त्यात कुठलाच धागा सापडत नव्हता. इकडे गावकऱ्यांनी खाताराम चा तपास लागला पाहिजे म्हणून मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे पोलिसांवर दबाब वाढला होता. खाताराम च्या पत्नीला बोलावून तपास केला असता तिने तोंड उघडले आणि घटनेचा उलगडा झाला.