क्राइम

२४ वर्षीय तरुणीवर कार मध्ये बलात्कार 

Spread the love

ठाणे / नवप्रहार डेस्क 

                     नोकरी मिळविण्यासाठी भेटीस आलेल्या तरुणीला दारू पाजून तिच्यावर कार मध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार तरुणीच्या तक्रारी नंतर समोर आला आहे. तरुणींचे वय २४ वर्ष असुन ई दिघा गाव परिसरात वास्तव्यास असते. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात एक स्वयंसेवी संस्था चालविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दिघा गावातील २४ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात होती , तिच्या काही मित्रांना याबाबत माहित होते. जोसेफ नावाचा मित्र नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करेल असे सांगून दोन मित्रांनी तिला खार येथे बोलावले या ठिकाणी जोसेफ हा देखील आला होता. एका हॉटेलमध्ये सर्वांनी मद्यपान केले.

हॉटेल बंद झाल्यानंतर सर्वजण बाहेर पडले. या तरुणीचे मित्र निघून गेले आणि ती एकटीच खार स्थानकाच्या दिशेने चालली होती. याचवेळी दुचाकीवरून निघालेल्या जोसेफने तिला थांबवले आणि दुचाकीवर बसण्यास सांगितले. उशिरा झाल्याने लोकल बंद झाल्या असतील असे सांगून जोसेफने तिला आपल्यासोबत घेतले. दोघेही दुचाकीवरुन वरळी परिसरात आले आणि या ठिकाणी एका पार्किंग केलेल्या कारमध्ये जोसेफने नेल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे

दारूच्या नशेत असल्याचा गैरफायदा घेत जोसेफ याने कारमध्ये बलात्कार केला. विरोध केला असता त्याने मारहाण केल्याचे तिने म्हटले आहे. आरोपी जोसेफ याला पोलिसांनी अटक केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close