पत्नीची हत्या करुन मृतदेहासोबत काढली सेल्फी आणि ती नातेवाईकांना पाठवली
गाजियाबाद (युपी ) / नवप्रहार डेस्क
पतीं आणि पत्नी दोघेही नोकरी करत होते. पती गाझियाबाद येथील एका कारखान्यात तर पत्नी नोएडा येथील कंपनीत काम करत होती. पत्नीने नोकरी करु नये असे पतीचे म्हणणे होते तर पत्नी नोकरी सोडायला तयार नव्हती. त्यामुळे त्यांच्यात नेहनी वाद व्हायचे. श्याम गोस्वामी असे पतीचे तर प्रिया असे पत्नीचे नाव होते. त्याने पत्नीची स्कार्फ ने गळा आवळून हत्या केली. तर त्याच स्कार्फ ने आत्महत्या केली. मुख्य म्हणजे त्याने पत्नीची हत्या केल्या नंतर तिचे डोके स्वतःच्या मांडीवर ठेवून सेल्फी काढली आणि ती नातेवाईकांना पाठवली.
अंकुर विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर विहार कॉलनीत ही घटना घडली. वास्तविक, महिलेचा लहान भाऊ प्रवीण तिला बऱ्याच दिवसांपासून फोन करत होता. सतत फोन न आल्याने तो घरी पोहोचला तेव्हा आतील दृश्य पाहून तो थक्क झाला. बहिणीचा मृतदेह बेडवर तर भाऊजींचा मृतदेह खोलीत लटकलेला होता. प्रवीणने तत्काळ यूपी-112 ला माहिती दिली. त्यानंतर डीसीपी विवेकचंद्र यादव यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
ग्रामीण झोनचे डीसीपी विवेक चंद्र यादव म्हणाले, PRV मार्फत पोलिसांना घरात पती-पत्नीचे मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती. प्राथमिक तपासाअंती मृत श्याम गोस्वामी हा मूळचा एटा येथील रहिवासी असून गाझियाबाद येथील एका कारखान्यात काम करत असल्याचे समोर आले आहे. पत्नी प्रिया (२३ वर्षे) आणि सहा वर्षांच्या मुलासह तो येथे भाड्याच्या घरात राहत होता. प्रिया नोएडा येथील एका कंपनीत काम करायची. त्याने सांगितले, श्यामने आधी प्रियाचा दुपट्ट्याने गळा दाबून खून केला, त्यानंतर त्याच दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांच्या गळ्यात एकाच स्कार्फचे काही टिश्यूही सापडले. याशिवाय प्रियाचा लहान भाऊ प्रवीण घरी पोहोचला तेव्हा दरवाजा आतून बंद होता. या दोन्ही गोष्टींवरून पतीने पत्नीचा खून करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू असल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे. श्यामला प्रियाचे नोएडामध्ये काम करणे आवडत नव्हते. तो अनेकदा पत्नीला नोकरी न करण्यास सांगत, यावरून त्यांच्यात वाद होत असे. अनेकवेळा प्रिया अनेक दिवस नोएडाहून गाझियाबादला घरीही आली नाही. शुक्रवारी श्यामने प्रियाची हत्या करून तिचे डोके आपल्या मांडीत ठेवले. त्यानंतर मोबाईलमधून सेल्फी काढून पाच-सहा नातेवाईकांना पाठवले. प्रियाची मोठी बहिण हा फोटो पाहून थक्क झाली. ती प्रियाला कॉल करते, पण कॉल रिसिव्ह होत नाही. यानंतर प्रियाचा लहान भाऊ प्रवीण याने घरी पोहोचून पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.