निवड / नियुक्ती / सुयशशैक्षणिक

अशोक पिंजरकर यांना राजीवगांधी राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार जाहीर

Spread the love

अंजनगाव सुर्जी ( मनोहर मुरकुटे )

अंजनगाव सूर्जी येथील दैनिक हिंदुस्थानचे lप्रतिनिधी अशोक पिंजरकर यांना राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा कृषी पत्रकारितेचा राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुमारे ३० वर्षा पासून कृषी पत्रकारिता करणारे पत्रकार अशोक पिंजरकर यांची राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.प्रकाशदादा साबळे यांनी या पुरस्कारासाठी अशोक पिंजरकर यांची निवड केली हे येथे उल्लेखनीय आहे.विशेष म्हणजे २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने तंटामुक्त पत्रकारितेचा पुरस्कार देऊन पत्रकार अशोक पिंजरकर यांना गौरविण्यात होते.तसेच २०२२ मध्ये एका २२ वर्षिय मुलाला शहानूर नदीत वाहून जातांना अशोक पिंजरकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मूलाला वाचविले होते त्याबद्दल तत्कालीन मंत्री ॲड.यशोमतीताई ठाकुर यांनी पिंजरकर यांचा सत्कार केला होता.तसेच कोरोना काळात अडचणीत असलेल्या मतिमंद, दिव्यांग, निराधार गरजूंना मोफत जेवणाची व्यवस्था केल्या बद्दल शासनाने व पाॅवर ऑफ मीडियाने सुद्धा पत्रकार अशोक पिंजरकर यांना गौरविले होते.पत्रकार अशोक पिंजरकर यांना माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी राज्य स्तरीय कृषी रत्न पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल दर्यापूर चे विद्यमान आमदार तथा अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मा.बळवंतभाऊ वानखडे,भारत रत्न राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.प्रकाश दादा साबळे पाटील,माजी आमदार रमेश बुंदिले, माजी नगराध्यक्ष एड. कमलकांत लाडोळे, दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक मा. विलास मराठे, ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक मा.आनंद विशाल , गोफणकार डॉ.रमेश गोटखडे, ठाणेदार प्रकाश अहिरे, विवेक संगई, डॉ. विलास कविटकर, डॉ.अमोल नालट,पावर ऑफ मिडियाचे अध्यक्ष मनोहर मुरकुटे, सुरेश साबळे, सुदेश मोरे प्रवीण भाऊ बोके, अनिल जिंतुरकर, सचिन अब्रूक, जयेंद्र गाडगे,गजानन चांदुरकर, उमेश काकड, सागर साबळे, सुनील माकोडे, अनंत मोहोड, रवींद्र वानखडे, दिलीप जुनघरे कुशल चौधरी आदी मान्यवर व्यक्तींनी हार्दिक अभिनंदन केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close