निशुल्क भव्य महा आरोग्य शिबीर व सर्व रोग निदान, उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
डॉ. गुणवंत राठोड कारंजा प्रतीनिधि-
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) स्व. आशादेवी चव्हाण बहुउद्देशिय संस्था, पहूर (ई.) यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क भव्य सर्व रोग निदान, उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन दिनांक 23 मे रोजी करण्यात आले आहे.
सदर शिबीरात पुढिल आरोग्य विषयक बाबीची तपासणी व उपचार केल्या जाईल.शिबिरात खालील डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत.
मेडीसीन तज्ञ रक्तदाब, अँजिओप्लास्टी, ब्लड शुगर, तसेच बरेच दिवसाचा ताप, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे,सर्जरी तज्ञ : अंगावरील गाठी, स्तनातील गाठी, आतड्याचे आजार, पोटाचे आजार, बरेच दिवसापासुन बरी न होणारी जखम, लगवी किंवा गुद्धारातुन रक्त जाणे, पोटामध्ये वारंवार दुख्ने.,स्त्रीरोग तज्ञ : मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे यॉनी मार्ग प्रमाणा बाहेर रक्तस्त्राव होणे,मुखरोग तज्ञ : घश्यामध्ये गिळतांना त्रास, तोंडामध्ये वारंवार होणारी जखम, पुर्णपणे तांड न उघडणे,नेत्ररोग तज्ञ : आवाजात अदल होणे, मुखदुर्गंधी इत्यादी. डोळ्याचे सर्व आजार, मोतियाबिंदु शास्त्रक्रिया, तिरळेपणा इ.अस्थिरोग तज्ञ: संधीवात, मणक्यात असणारी गाठ, वाकलेले पाय, फ्रेंकचर, तसेच हाडांचे सर्व आजार. त्वचारोग तज्ञ : खाज, गजकरण, अंगावरील पांढरे डाग, डाग, त्वचेचे विवीध आजार.बालरोग तज्ञ : हृदयाला छिद्र असणे, मतिमंद मुलांच्या विकासा संबंधी आजार, तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार.
शिबिर स्थळावर नोंदणी मोफत तज्ञ डॉक्टरांनकडुन मोफत तपासणी व सल्ला व शिबीरानंतर भरती रुग्णांना सर्वसामान्य चाचण्या उदा. (एक्स-रे, रक्त, लघवी चाचणी, सोनोग्राफी) मोफत,भरती असणाऱ्या रुग्णांना खाट शुल्क, जेवण मोफत अतिविशिष्ट चाचण्या (सीटी स्कॅन, एम. आर. आय., इत्यादी चाचण्या) आवशकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्यानुसार पुर्णतः मोफत, रुग्णांचा आजार सरकारी योजनेत येत असल्यास सरकारी योजनेला प्राधान्य देण्यात येईल. रुग्णांचा आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास उपचार मोफत करण्यात येईल. या शिबीरामध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान व संदर्भ सेवा देण्यात येईल. फाटलेले ओठ, दुभंगलेले टाळू, जबडा तसेच जन्मता असलेली मुखविकृतीवर शस्त्रक्रिया मोफत,गुडघे व कंबरेच्या सांध्याचे प्रत्यारोपन महात्मा फुले जनआरोग्य योजनेत असल्यास मोफत, मोतियाबिंदू, हायड्रोसिल, हर्निया, अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया मोफत करण्यात येईल.तसेच भरती रूग्णांना हॉस्पीटल मध्ये जाण्याकरीता वाहनांची व्यवस्था मोफत राहील. शिबीरामध्ये येतांना रूग्णांनी आधार कार्ड आणि राशन कार्ड सोबत आणावे.
सदर शिबिराची तारीख गुरुवार 23 मे 2024असून सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत महेश भवन, गायत्री मंदिरासमोर, कारंजा येथे आयोजित केले आहे. सदर शिबिराला उपस्थित राहन्याचे आवाहन डॉ महेश चव्हाण आणि मित्र मंडळ, कारंजा-मानोरा यांनी केले आहे.