लॉयन्स क्लब चे सेवाभावी उपक्रम पाणपोई चे उदघाटन
धामणगाव रेल्वे (ता.प्र)
येथील लायन्स क्लबच्या वतीने रहदारीच्या मुख्य मार्गावर पाणपोई लावण्यात आली असून या पाणपोईचे रीतसर उद्घाटन करण्यात आले.
जवळजवळ शंभरावर अधिक गावांचा विस्तार असलेल्या ग्रामीण भागातून बिस्लरीच्या काळातील अनोळखीच्या या शहरात आलेल्या ग्रामिनांची तहान शेवटी रस्त्याच्या कडेला असलेल्या पाणपोईच भागवतात यासाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लबने स्वर्गीय नरेंद्र भोगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ येथील शिवाजी चौकात शुद्ध व शितल जल देणारी पाणपोई उभारली आहे.
या पाणपोईचे उद्घाटन पत्रकार चेतन पसारी यांच्या हस्ते व लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य एड.रमेशचंद्र चांडक, क्लबचे अध्यक्ष अतुल भोगे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी प्रेमचंद मुंधडा,रामेश्वर चांडक,आशिष मुंधडा,रितेश राठी,विशाल पणपालिया,चंदू पाटील,सतीश बुब,अमरसिंह ठाकूर,मुस्तफा भाई,कमल टावरी,संकेत कोळमकर,आकाश पणपालिया,मेहेर निस्ताने, मनोज मुंधडा, प्रवीण तलवारे, संजय वर्मा आदी सदस्य उपस्थित होते.