अपघात

बोलेरो उभ्या ट्रक ला धडकली ; आठ लोकांचा मृत्यू 

Spread the love
 

इंदौर  / नवप्रहार मीडिया 

                 एका गावात कार्यक्रमासाठी गेलेल्या लोकांवर परतीच्या प्रवासात काळाने घाळा घातला आहे. या लोकांची बोलेरो उभ्या असलेल्या ट्रक ला धडकल्याने आतज लोकांचा मृत्यू झाला आहे. घटना मध्य प्रदेशातील घाटाबिल्लोद महामार्गावर घडली. अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे. बुधवारी रात्री झालेल्या या अपघातामुळे गुना जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सर्वजण अलीराजपूरच्या बोरी गावात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. परतताना बुधवारी रात्री उशिरा घाटा बिल्लोद इथं ट्रकला धडक बसली. अपघातात महिलेसह ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह बेटमा रुग्णालयात आणले असून एएसपी रुपेश द्विवेदी यांनी अपघात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तर एक जण जखमी झाला आहे.
अपघात बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठा आवाज झाला. गाडीतील लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बचावकार्य राबवण्यात आलं. पण अपघातात ८ जण मृत्यूमुखी पडले.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close