अपघात

करळगाव घाटाच्या वर ट्रक उलटला.

Spread the love

यवतमाळ / प्रतिनिधी

यवतमाळ धामणगाव कडून यवतमाळ कडे येणाऱ्या प्रकारचे नियंत्रण गेल्याने रस्त्यावरील दुभाजकाला भिडून घाटाच्यावर उलटला. यामध्ये कांदा आणि मिरची रस्त्यावरती विखुरला गेल्याने काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. या अपघाताची माहिती नागरिकांना मिळतात तात्काळ मदत कार्याकरिता गेल्याने त्या मधील पोती दुसऱ्या ट्रकमध्ये भरून रस्ता साफ करण्यात आला.
धामणगाव येथून कांदा आणि मिरची भरलेला ट्रक घेऊन यवतमाळ कडे येत असताना चढावर चालकाचे नियंत्रण गेल्याने तो रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन भिडल्याने ट्रक उलटला. त्यामध्ये असलेल्या कांद्याची पोती व मिरच्या रस्त्यावरती फेकल्या गेल्या हा अपघात साधारणता ११ ते ११.३० दरम्यान घडला. यामध्ये शहर पोलीस स्टेशन येथे कुठलीही तक्रार नोंद नसल्याने या अपघातामध्ये जखमींच्या नावाची माहिती मिळू शकली नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close