क्राइम

लव्ह जिहाद ; हिंदू असल्याचे सांगून महिलेवर बलात्कार

Spread the love
अश्लील व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक शोषम

जयपूर / नवप्रहार डेस्क 

                    हिंदू असल्याचे सांगून महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आणि अश्लील व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक शोषन करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत . सलमान खान असे त्याचे नाव आहे. मुख्य म्हणजे त्याने यापूर्वी सुद्धा 3- 4 हिंदू महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे सुध्दा लैंगिक शोषण केले असल्याचे तपासात समोर आले आहे. पीडित महिला ही सांगानेर येथील रहिवाशी आहे.

              पोलिसांकडून उपलब्ध माहिती नुसार सलमान खान याचे मोबाईल दुरुस्ती चे दुकान आहे. त्याने स्वतः हिंदू असल्याचे भासवत एका 25 वर्षीय महिलेला आपल्या प्रेम जाळ्यात ओढले. तिच्या सोबत शारिरीक संबंध बनवले. या घटनेचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. तिच्या कडून 2 ते 4 लाख रु.उकळले. तिला जबरदस्तीने दिल्ली येथे घेऊन गेला. कुटुंबीयांनी शिप्रा पथ ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. .

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करून पीडितेला दिल्लीतून आणले आणि तिला कुटुंबाच्या ताब्यात दिले. तसेच पोलिसांनी दिल्लीतून सलमान खानलाही अटक केली. तपासादरम्यान असे उघड झाले की, आरोपीनी यापूर्वी अशाच पद्धतीचा वापर करून इतर तीन- चार हिंदू महिलांना अडकवले होते. पोलिसांनी सलमान खानचा मोबाईल जप्त केला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. सध्या आरोपीची अधिकची चौकशी पोलीस करत आहेत. पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम १६४ अंतर्गत पीडितेचा जबाबही नोंदवला.

या प्रकरणाबाबत बोलताना शिप्रा पथ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अमित कुमार यांनी सांगितले की, ‘पीडित मुलगी पाच सहा वर्षांपूर्वी आरोपीला पहिल्यांदा भेटली होती. सलमान खान आठवी नापास असून मूळचा अजमेरचा रहिवासी आहे. त्याने तिच्या नावावर स्कूटीही खरेदी केली होती.’

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close